Diabetes symptoms saam tv
लाईफस्टाईल

Diabetes symptoms: डायबेटीसच्या रुग्णांना इशारा, शरीरात ५ बदल दिसले तर सावध व्हा; होऊ शकते किडनी फेल

Diabetes kidney failure warning signs: मधुमेहामुळे किडनी निकामी होण्यापूर्वी शरीर काही स्पष्ट संकेत देतं. अनेकदा मधुमेही रुग्ण थकवा किंवा वाढलेलं वय म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी ५ महत्त्वाच्या लक्षणांकडे रुग्णाने दुर्लक्ष करू नये.

Surabhi Jayashree Jagdish

  • मधुमेहामुळे किडनीवर गंभीर परिणाम होतो

  • डायबेटिक नेफ्रोपॅथीमुळे फिल्टरिंग कार्य बिघडते

  • सुरुवातीची लक्षणं सौम्य आणि दुर्लक्षित होतात

देशभरात मधुममेहाने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या काही कमी आहे. यापैकी अनेकजण असे आहेत ज्यांना आपल्याला मधुमेह झालाय याची कल्पनाही नसते. डायबेटीज म्हणजेच मधुमेह हा म्हणजे केवळ रक्तातील साखरेची असंतुलित पातळी नाहीये. तर या गंभीर आजाराचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होत असतो. यामध्ये शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर आणि विशेषतः किडनीच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतात.

संपूर्ण जगभरात मधुमेह हा किडनीच्या विकारांसाठी एक प्रमुख कारण मानण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे रक्तातील साखरेचं नियंत्रण बिघडल्यामुळे किडनीचं मुख्य कार्य जसं की, रक्तातून अपायकारक घटक आणि अतिरिक्त द्रव बाहेर टाकणं यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. डायबेटीज आणि किडनीचं कार्य यांच्यातील संबंध समजून घेणं फार गरजेचं आहे.

मधुमेहाचा तुमच्या किडनीवर कसा होतो परिणाम?

इंडियन स्पायनल इंज्युरी सेंटरचे सल्लागार नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. उदित गुप्ता यांनी सांगितलं की, मधुमेहामुळे किडनीमध्ये डायबेटिक नेफ्रोपॅथी नावाची स्थिती निर्माण होऊ लागते. या अवस्थेत रक्तातील साखरेची पातळी सातत्याने जास्त असल्यामुळे किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर ताण येतो. त्यामुळे किडनीच्या फिल्टरिंगचं कार्य बिघडतं. अधिक प्रमाणात ताण आल्यामुळे किडनी निकामी होण्याचा धोकाही बळावतो.

डायबेटीजमुळे किडनीवर परिणाम होण्याची कारणं

मधुमेहामुळे होणारे किडनीचे त्रास विकार हळूहळू विकसित होतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे उच्च रक्तातील साखर.. ही किडनीच्या फिल्टरिंग युनिट्सना हानी पोहोचवते. याशिवाय, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि आनुवंशिक कारणंही महत्त्वाची भूमिका बजावतात.

या विकाराची सुरुवातीची लक्षणं सौम्य मानली जातात. याकडे अनेकदा दुर्लक्षही केलं जातं. परिणामी, ज्यावेळी किडनीच्या समस्यांचं निदान होतं त्यावेळी फार उशीर झालेला असतो. अशावेळी कोणती सामान्य लक्षणं दिसून येतात ते पाहूयात.

  • हात, पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणं

  • रक्तदाब वाढणं

  • वारंवार लघवी होणं

  • थकवा जाणवणं

  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण

  • भूक मंदावणं किंवा मळमळ

मधुमेहामुळे किडनीच्या समस्या होण्याची शक्यता वाढवणारे घटक-

  • बऱ्याच काळापासून असलेला मधुमेह

  • रक्तातील साखरेचं नियंत्रण नसणं

  • उच्च रक्तदाब

  • धूम्रपान

  • कुटुंबात मूत्रपिंड विकाराचा इतिहास

डायबेटीज असलेल्या रूग्णांना कशी घ्यावी किडनीची काळजी?

रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा

नियमित तपासणी करून साखरेची पातळी नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे.

रक्तदाब नियंत्रित ठेवा

डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदाबावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. काही वेळा ARBs सारखी औषधं उपयोगी ठरतात.

संतुलित वजन राखा

नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे वजन नियंत्रणात ठेवा. मीठाचं प्रमाण कमी ठेवणं गरजेचं आहे.

धूम्रपान टाळा

धूम्रपानामुळे किडनीचं नुकसान अधिक वाढतं आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंती वाढण्याचा धोका असतो.

मधुमेहामुळे किडनीवर कसा परिणाम होतो?

साखर वाढल्यामुळे किडनीच्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो.

डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणजे काय असते?

किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं कार्य बिघडतं.

किडनीच्या त्रासाची सुरुवातीची लक्षणं कोणती?

सूज, थकवा, लघवी वाढणं ही लक्षणं असतात

किडनीच्या आजाराचा धोका कोणामुळे वाढतो?

हाय ब्लड शुगर, रक्तदाब, लठ्ठपणा आणि धूम्रपान.

मधुमेह असताना किडनीची काळजी कशी घ्यावी?

साखर, रक्तदाब, वजन आणि आहार नियंत्रित ठेवा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT