Tea drinking habit: चहाचे शौकीन असाल तर 'ही' चूक अजिबात करू नका; कॅन्सरचा धोका असल्याचं संशोधकांचं मत

Hot tea cancer risk: भारतात चहा (Tea) हे केवळ एक पेय नाही, तर एक भावना आहे. सकाळची सुरुवात असो किंवा कामाचा ब्रेक, गरमागरम चहाचा कडक घोट घेतल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. पण, तुमची ही 'गरमागरम' चहा पिण्याची सवय तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते
Hot tea cancer risk
Hot tea cancer risksaam tv
Published On
Summary
  • अति गरम चहा कॅन्सराचे कारण ठरू शकतो

  • ६५°C पेक्षा जास्त तापमान धोकादायक आहे

  • अन्ननलिकेच्या पेशींमध्ये बदल होऊ शकतात

भारतात चहा हा फक्त एक पेय नसून अनेकांसाठी ती एक भावना आहे. सकाळची गुंगी घालवायची असो किंवा थकवा दूर करायचा असो, बहुतांश लोक लगेच चहा पितात. अनेक घरांत तर दिवसाची सुरुवात चहा प्यायल्याशिवाय होतच नाही. पण हाच आवडता चहा जर खूप गरम प्यायला तर त्यामुळे शरीराला गंभीर नुकसान होऊ शकतं.

चहा प्यायल्याने कॅन्सर होतो?

वैज्ञानिक संशोधनांनी सिद्ध केलं आहे की, अतिशय गरम चहा प्यायल्याने अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. आपण वारंवार ६५ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानाचा चहा किंवा इतर गरम पदार्थ ज्यावेळी खातो तेव्हा अन्ननलिकेचं नाजूक आवरण जळतं. हे आवरण पुन्हा पुन्हा जळल्याने सूज येऊ शकते. या सूजेबरोबरच पेशींमध्ये बदल होऊ लागतात आणि हळूहळू हे बदल कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतात. विज्ञानाच्या भाषेत याला ‘क्रॉनिक इंफ्लेमेशन’ आणि ‘सेल म्युटेशन’ असे म्हणतात.

कधी होऊ शकतो अन्ननलिकेचा कॅन्सर?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ६५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त गरम पदार्थ नियमितपणे खाल्ल्याने अन्ननलिकेचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. मग हा कॅन्सर नेमका कोणता आणि त्याचे प्रकार कोणते? अन्ननलिकेमध्ये दोन मुख्य प्रकारचे कॅन्सर आढळतात. पहिला म्हणजे ‘एसोफेजियल स्क्वैमस सेल कार्सिनोमा’, जो बहुतेक नलिकेच्या वरच्या भागात होतो आणि त्याचे प्रमुख कारण खूप गरम पेय किंवा तंबाखूचे सेवन असते.

Hot tea cancer risk
Silent Heart Attack: थकवा, पाठदुखी की सायलेंट हार्ट अटॅक? दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतू शकतं

यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे ‘एसोफेगल अ‍ॅडेनोकार्सिनोमा’, जो नलिकेच्या खालच्या भागात होतो आणि तो दीर्घकाळ चालणारी आम्लपित्ताची समस्या म्हणजेच असिडीटी यांच्यामुळे बळावतो.

चहा धोकादायक नाही, पण चहाचं अतिगरम तापमान तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. चहा, कॉफी किंवा सूप या गोष्टी जर अती गरम असताना त्यांचं सेवन केलं तर तर त्यातून धोका निर्माण होतो.

Hot tea cancer risk
Heart attack risk: पहाटेच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त? 'या' एका कारणामुळे येतो हार्ट अटॅक

आयुर्वेदात काय म्हटलं आहे?

आयुर्वेदाच देखील असं नमूद करण्यात आलंय की, अन्न किंवा पेय खूप गरम नसावं, ना खूप थंड असावं. आयुर्वेदानुसार ‘उष्ण’ म्हणजे कोमट पेय पचनाला मदत करते, पण ते अत्यंत गरम असेल तर ‘पित्त’ वाढू शकतं. त्यामुळे शरीरात इन्फामेशन निर्माण होते आणि अनेक आजारांची मुळे तयार होतात.

Hot tea cancer risk
Heart Attack Prevention: व्यायाम करताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? या उपायांनी वाचू शकते जीवन

जर एखाद्याला अन्न गिळताना त्रास होत असेल, घशात सतत खराश जाणवत असेल, गिळताना वेदना होत असतील आणि त्याचबरोबर कोणत्याही कारणाशिवाय वजन झपाट्याने कमी होत असेल तर हे गंभीर संकेत असू शकतात. अशा वेळी वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. बर्‍याचदा आपण हे लक्षणं सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र ही समस्या नंतर गंभीर परिस्थिती निर्माण करते.

Hot tea cancer risk
रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल
Q

गरम चहा कॅन्सर घेऊन येतो का?

A

होय, अति गरम चहा कॅन्सराचा धोका वाढवतो.

Q

किती तापमानापर्यंत चहा सुरक्षित आहे?

A

६५°C पेक्षा कमी तापमान सुरक्षित आहे.

Q

अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे कोणती?

A

गिळताना वेदना, वजन कमी होणे, घशात खवखव.

Q

आयुर्वेद गरम पेयांबद्दल काय सांगतो?

A

अति गरम पेय पित्त वाढवते, टाळा.

Q

गरम चहा का धोकादायक आहे?

A

तो अन्ननलिकेच्या आवरणाला जाळतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com