Heart attack risk: पहाटेच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त? 'या' एका कारणामुळे येतो हार्ट अटॅक

Heart attack risk in morning: अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, सकाळी लवकर हृदयविकाराचा धोका अधिक असतो. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे, जे आपल्या शरीराच्या नैसर्गिक चक्राशी जोडलेले आहे.
Heart attack risk in morning
Heart attack risk in morningsaam tv
Published On
Summary
  • पहाटेच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

  • वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) हृदयविकाराचे मुख्य कारण आहे.

  • जंक फूड आणि तळलेले पदार्थ LDL वाढवतात.

अनेक लोकांसाठी पहाटेचे तास शांत झोपेचे असतात. पण ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी ही वेळ धोकादायक ठरू शकते. सकाळच्या वेळेत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो आणि यामागे कोलेस्ट्रॉल हा मोठा कारणीभूत घटक आहे. हा धोका कसा निर्माण होतो आणि त्यापासून बचाव कसा करावा हे आपण जाणून घेऊया.

हृदयविकाराचा झटका नेमका का येतो?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, "हृदयविकाराचा झटका म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD). पूर्वी वयस्कर लोकांना हा आजार जास्त होत असे, पण आता तरुणांमध्येही याची संख्या वाढली आहे. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी धमन्यांमध्ये प्लाक म्हणजे चरबीचा थर साचतो. त्याला 'अॅथेरोस्क्लेरोसिस' म्हणतात. त्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि हृदयाला झटका येतो."

हृदयविकारामागे सर्वात मोठं कारण म्हणजे वाईट कोलेस्टेरॉल (LDL). याचं प्रमाण 100 mg/dL पेक्षा कमी असावं. पण जर एखाद्याला डायबेटीस, आधीचा हृदयविकार किंवा इतर हृदयविषयक समस्या असतील तर हे प्रमाण 70 mg/dL पेक्षा कमी ठेवणं गरजेचं आहे.जंक फूड, तळलेले पदार्थ, रेड मीट, जास्त तेलकट खाणं – यामुळे LDL झपाट्याने वाढतो.

Heart attack risk in morning
Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

आहाराचा परिणाम

जास्त तेलकट पदार्थ उदा. मटण, चिकन, पाम तेल, तुपातले पदार्थ यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. शिवाय हे पदार्थ डीप फ्राय केले की ट्रान्स फॅट तयार होतं, जे शरीरासाठी अजून धोकादायक आहे. त्यामुळे तेलकट, जंक आणि तळलेले पदार्थ टाळणं आवश्यक आहे.

सकाळी हार्ट अटॅक का जास्त येतो?

संशोधनात दिसून आलंय की पहाटे ३ ते ६ या वेळेत झटका येण्याचा धोका जास्त असतो. कारण या वेळी शरीरात स्ट्रेस हार्मोन जास्त प्रमाणात स्रवतो आणि PAI-1 नावाचा प्रोटीन वाढतो, ज्यामुळे रक्त घट्ट होतं. अशा वेळी रक्तदाब आणि शुगरही जास्त असते. त्यामुळे डायबेटीस किंवा हायब्लड प्रेशर असलेल्या लोकांना धोका आणखी वाढतो."

Heart attack risk in morning
Wrong Blood Group: चुकीच्या ब्लड ग्रुपचं रक्त चढवल्यास माणसाचा लगेच मृत्यू होतो का? शरीरावर काय होतो परिणाम?

लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं

सकाळी येणारे झटके गंभीर असतात आणि अनेकदा लोक त्यांना गॅस, अॅसिडिटी किंवा घाबरल्यासारखं समजून दुर्लक्ष करतात. छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, घाम येणं ही लक्षणं दिसली तर तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेणं गरजेचं आहे. तातडीने उपचार केले तर जीव वाचू शकतो.

Heart attack risk in morning
Dangers of expired medicine: एक्सपायरी झालेली औषध घेतली तर काय होऊ शकतं? जाणून घ्या ही औषधं फेकण्याची योग्य पद्धत

बचाव कसा करावा?

  • दररोज किमान ६ तासांची झोप घ्यावी.

  • जास्त तेलकट आणि जंक फूड टाळून फायबरयुक्त संतुलित आहार घ्यावा.

  • रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियमित तपासावं. BP 120/70 पेक्षा कमी आणि LDL 100 mg/dL पेक्षा कमी असावा.

  • धूम्रपान पूर्णपणे टाळावं.

  • आठवड्यातून किमान ५ दिवस, दररोज ३० मिनिटं व्यायाम करावा.

Q

हृदयविकाराचा झटका का येतो?

A

कोरोनरी धमन्यांमध्ये चरबीचा थर जमा होऊन रक्तपुरवठा अवरोधित होण्यामुळे झटका येतो.

Q

वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) चे सुरक्षित प्रमाण किती असावे?

A

सामान्य व्यक्तीसाठी LDL 100 mg/dL पेक्षा कमी असावे.

Q

सकाळी हृदयविकाराचा झटका का जास्त येतो?

A

पहाटे स्ट्रेस हार्मोन वाढतात, रक्त घट्ट होते आणि रक्तदाब वाढतो म्हणून धोका जास्त असतो.

Q

हृदयविकाराची लक्षणे कोणती आहेत?

A

छातीत वेदना, श्वास घेण्यात त्रास, जास्त घाम येणे ही मुख्य लक्षणे आहे

Q

हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय फायदेशीर आहेत?

A

संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान टाळणे आणि नियमित तपासणी करणे फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com