Cancer progression: शरीरात कशी होऊ लागते कॅन्सरची सुरुवात? प्रत्येक कॅन्सरच्या स्टेजमध्ये रूग्णाच्या शरीरात कसे होतात बदल?

Body changes in late-stage cancer: कर्करोगाची सुरुवात आपल्या शरीरातील पेशींमध्ये होणाऱ्या अनियंत्रित बदलांमुळे होते. निरोगी पेशी एका विशिष्ट क्रमाने वाढतात, विभाजित होतात आणि मरतात.
Cancer progression
Cancer progressionsaam tv
Published On
Summary
  • कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला अतिशय सौम्य असतात.

  • पहिल्या टप्प्यात कॅन्सर एका भागात मर्यादित असतो.

  • दुसऱ्या टप्प्यात गाठीचा आकार २ सेमीपेक्षा जास्त होतो.

कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्याचं नाव ऐकताच अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. याचं कारण अगदी स्पष्ट आहे, हा आजार शरीराच्या कुठल्याही भागात हळूहळू वाढू शकतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवघेणा ठरू शकतो. या आजाराची सर्वात मोठी बाब म्हणजे सुरुवातीला तो अतिशय सौम्य लक्षणं दाखवतो.

बहुतांश वेळा लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण जर सुरुवातीच्या टप्प्यातच कॅन्सरची ओळख पटली तर रुग्णाचे प्राण वाचवणं शक्य होतं. याच कारणामुळे डॉक्टर कॅन्सरचे वेगवेगळे टप्पे (Stages of Cancer) ठरवतात. जेणेकरून रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना नेमकं आजार कोणत्या स्थितीत आहे आणि त्यावर उपचार कसे होणार हे समजायला सोपं जातं.

कॅन्सरचा पहिला टप्पा

तज्ज्ञांच्या मताने कॅन्सरची सुरुवात ह्याच टप्प्यात होते. उदाहरणार्थ, स्तनाचा कॅन्सर (Breast Cancer) च्या पहिल्या टप्प्यात स्तनात एक लहानशी गाठ तयार होऊ शकते. साधारणपणे ही गाठ 2 सेंटीमीटरपेक्षा लहान असते. यामध्ये कॅन्सर फक्त त्याच जागी मर्यादित राहतो, आसपास पसरत नाही.

रुग्णाला वेदना किंवा मोठं लक्षण जाणवत नाही. हाच तो काळ असतो जेव्हा नियमित तपासणी किंवा स्क्रीनिंगमुळे कॅन्सर सहजपणे सापडू शकतो. जर या टप्प्यातच कॅन्सरची ओळख पटली, तर उपचार जवळपास नक्की यशस्वी होतात. त्यामुळे डॉक्टर नेहमी हेल्थ चेकअप करण्याचा सल्ला देतात.

कॅन्सरचा दुसरा टप्पा

  • दुसऱ्या टप्प्यात गाठीचा आकार 2 सेंटीमीटरपेक्षा मोठा होतो.

  • हा कॅन्सर अधिक सक्रिय होऊ लागतो, पण तरीही मुख्यत्वे त्या भागातच मर्यादित असतो.

  • या टप्प्यात रुग्णाला गाठ किंवा सूज जाणवू शकते. काही वेळा वेदना, थकवा किंवा शरीरात अनियमित बदल दिसू शकतात.

या स्थितीत उपचार शक्य असतात मात्र पहिल्या टप्प्यापेक्षा आव्हानात्मक ठरतात. डॉक्टर या काळात बहुतांश वेळा शस्त्रक्रिया, रेडिएशन किंवा औषधोपचारांचा वापर करतात.

Cancer progression
Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

कॅन्सरचा तिसरा टप्पा

  • आजारपण जसजसं पुढे जातं, तसतसं कॅन्सर मूळ जागेवरून निघून आसपासच्या लसिका ग्रंथींमध्ये (Lymph Nodes) पोहोचतो. याला तिसरा टप्पा म्हणतात.

  • आता कॅन्सर फक्त गाठीपुरता मर्यादित राहत नाही, तर शरीराच्या इतर भागांवरही परिणाम करू लागतो.

  • रुग्णाला गाठीचा आकार मोठा वाटू शकतो आणि शरीरातील बदल जास्त स्पष्ट दिसू लागतात.

हा टप्पा गंभीर मानला जातो आणि उपचारही अधिक गुंतागुंतीचे आणि दीर्घकालीन होतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास कॅन्सर झपाट्याने चौथ्या टप्प्यात प्रवेश करतो.

कॅन्सरचा चौथा टप्पा

  • चौथा टप्पा हा सर्वात धोकादायक मानला जातो.

  • या अवस्थेत कॅन्सर आपल्या मूळ जागेवरून शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पसरतो. जसं की फुफ्फुसं, यकृत, हाडं किंवा मेंदू.

  • हा टप्पा आल्यावर आजारावर नियंत्रण ठेवणं अतिशय अवघड होतं.

या स्थितीत उपचारांचा मुख्य उद्देश रुग्णाची वेदना कमी करणं आणि आयुष्य शक्य तितकं वाढवणं हा असतो. याला Advanced Cancer असंही म्हटलं जातं.

Cancer progression
Brain Tumor Early Symptoms : ब्रेन ट्यूमरच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये शरीरात दिसतात हे 6 मोठे बदल; लक्षण ओखळून लगेच डॉक्टरकडे जा

वेळेवर निदान का महत्त्वाचं?

कॅन्सरविषयीची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जर तो सुरुवातीलाच लक्षात आला तर रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता खूप जास्त असते. मात्र उशीर झाला, तर उपचार अधिक कठीण आणि खर्चिक होतात. म्हणूनच नियमित तपासणी केली पाहिजे. त्याचप्रमाणे शरीरात कुठलीही गाठ, अनोळखी सूज, दीर्घकाळ चालणारी खोकला किंवा थकवा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

Cancer progression
Early signs of liver cancer: शरीरात 'हे' 6 बदल दिसले तर समजा लिव्हर कॅन्सर झालाय; तातडीने डॉक्टरांकडे जा
Q

कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यात कॅन्सर कोठे मर्यादित असतो?

A

पहिल्या टप्प्यात कॅन्सर मूळ जागीच मर्यादित असतो, आसपास पसरत नाही.

Q

कॅन्सरचा दुसरा टप्पा कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो?

A

गाठीचा आकार वाढणे, सूज, वेदना किंवा थकवा यांनी दुसरा टप्पा ओळखला जातो.

Q

कॅन्सरचा तिसरा टप्पा कोणत्या बदलाने ओळखला जातो?

A

कॅन्सर लसिका ग्रंथींमध्ये पोहोचल्यावर तिसरा टप्पा सुरू होतो.

Q

चौथ्या टप्प्यात कॅन्सर कोणत्या अवयवांपर्यंत पसरतो?

A

चौथ्या टप्प्यात कॅन्सर फुफ्फुसे, यकृत, हाडे किंवा मेंदूपर्यंत पसरतो

Q

कॅन्सरचे वेळेवर निदान का महत्त्वाचे आहे?

A

वेळेवर निदानाने उपचार यशस्वी होतात आणि रुग्णाचे प्राण वाचवता येतात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com