Heart Attack Prevention: व्यायाम करताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? या उपायांनी वाचू शकते जीवन

Healthy Heart Tips: हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे याची माहिती बराचवेळा अनेकांना नसते.
Heart Attack
Heart AttackSaam Tv
Published On

Heart Attack Prevention Tips:

हरियाणा पोलीस दलातील डेप्युटी जेलर जोगिंदर देशवाल यांचे हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. या बातमीमुळे अनेकांचे टेन्शन वाढलंय. निरोगी जीवनासाठी व्यायाम गरजेचा असतो. तेच करताना मृत्यू येत असेल तर काय करावे? असा प्रश्नांनी अनेकांच्या डोक्यात काहूर माजवला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी गरबा खेळताना हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू १० ते १२ जणांचा मृत्यू झाला. या सर्व बातम्यांमुळे आरोग्याची चिंता सर्वांना लागलीय. (Latest News)

हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे याची माहिती बराचवेळा अनेकांना नसते. यामुळे जीव दगावण्याची संख्या अधिक आहे. निरोगी जीवनासाठी काय कलेल पाहिजे याची माहिती असणं आवश्यक आहे. हर्ट अटॅक येणं ही गंभीर समस्या बनलीय. सध्या देशात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२५ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही झपाट्याने वाढतय. नुकतेच गुजरातमध्ये गरबा खेळत असताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला. गरीब जीवनशैली आणि तणावामुळे तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येत असल्याचे या घटनांवरून दिसून येते.

हर्ट अटॅक आल्यानंतर काय करावे

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सर्वप्रथम व्यक्तीला शांत ठिकाणी झोपायला लावावे. जर कोणी अचानक बेशुद्ध झाला तर सर्वप्रथम त्या व्यक्तीची नाडी तत्काळ तपासावी. जर नाडी अजिबात जाणवत नसेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आलाय. कारण हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाचे ठोके पडणं बंद होत असतं, यामुळे नाडी सापडत नाही.

अशा स्थितीत २ ते ३ मिनिटांत त्याचे हृदय रिवाइव म्हणजेच पुनरुज्जीवित करणे आवश्यक असतं. नाहीतर शरीरातील ऑक्सीजन कमी झाल्याने त्या व्यक्तीचं ब्रेन डॅमेज होत असतं. यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब छातीवर जोरात दाब द्या. तो व्यक्ती शुद्धीवर येईपर्यंत त्याची छातीवर दाब द्या, जेणेकरूण त्यामुळे त्याचे हृदय पुन्हा काम करू लागेल.

बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला ताबडतोब सीपीआर द्या

जर एखाद्या व्यक्ती बेशुद्ध झाला असेल आणि त्याची नाडी जाणवत नसेल तर त्याला ताबडतोब हाताने CPR द्या. सीपीआर दोन प्रकारे दिली जातात. पहिला म्हणजे छाती दाबणे आणि दुसरे म्हणजे तोंडातून श्वास देणे. याला माउथ टु माउथ रेस्पिरेशन म्हटलं जातं. सीपीआर देताना तुम्ही तुमचे दोन्ही हात त्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी ठेवा.

पंपिंग करताना एका हातावर एक हात ठेवा . हाताची बोटे घट्ट बंद करा. दोन्ही हात आणि कोपर सरळ ठेवा. त्यानंतर पंपिंग करताना त्या व्यक्तीची छाती दाबा. तळहाताने छाती १ ते २ इंच दाबली जाईल असा दाब द्या. असे केल्याने हृदयाचे ठोके पुन्हा सुरू होतात. ही कृती एका मिनिटात शंभर वेळा करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com