Signs Of Kidney Damage In Urine saam tv
लाईफस्टाईल

Kidney Damage: किडनी निकामी होण्यापूर्वी लघवीमध्ये दिसतात 'ही' लक्षणं, 99% लोकं सामान्य समजून करतात दुर्लक्ष

Signs Of Kidney Damage In Urine: किडनीत थोडासा अडथळा आला तर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक प्रमुख अवयवांवर होण्याची शक्यता असते. अशावेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी मूत्रपिंड निरोगी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. शरीरामध्ये असलेल्या विषारी पदार्थांना फिल्टर करण्याचं काम किडनी करते. हे घटक लघवीद्वारे बाहेर पडतात. किडनीत थोडासा अडथळा आला तर त्याचा परिणाम शरीराच्या अनेक प्रमुख अवयवांवर होण्याची शक्यता असते. अशावेळी शरीर निरोगी ठेवण्यासाठी किडनी निरोगी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

मात्र सध्या चुकीच्या आहार आणि खराब जीवनशैलीमुळे किडनीच्या आरोग्याचं खूप नुकसान होतं. आजकाल लोकांमध्ये किडनीशी संबंधित आजार झपाट्याने वाढ होताना दिसतेय. किडनीच्या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. किडनी निकामी देखील होऊ शकते. किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात विविध लक्षणं दिसू शकतात. यापैकी काही लक्षणं लघवीमध्ये देखील दिसून येऊ शकतात. ही लक्षणं कोणती ते पाहूयात.

वारंवार लघवी होणं

वारंवार लघवी होणं हे किडनीच्या नुकसानाचं लक्षण देखील असू शकतं. रात्री लघवी करण्यासाठी वारंवार उठत असाल तर हे किडनी योग्य पद्धतीने काम करत नसल्याचं लक्षण आहे. अशावेळी डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर ठरेल.

लघवीला फेस येणं

लघवीमध्ये जास्त प्रमाणात फेस येणं हे किडनीच्या नुकसानाचं लक्षण असू शकत. ज्यावेळी मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करण्यास सक्षम नसते तेव्हा लघवीमध्ये प्रोटीनची मात्रा वाढते. यामुळे लघवीतून फेस येऊ शकतो.

लघवीला दुर्गंधी येणं

लघवीतील दुर्गंधी देखील किडनीच्या नुकसानाचं लक्षण असू शकतं. ज्यावेळी किडनी नीट काम करू शकत नाही, तेव्हा शरीरात टॉक्सिन पदार्थ पदार्थ जमा होऊ लागतात. यामुळे लघवीत दुर्गंधी येऊ शकते. यावेळी वेळीच डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर असतं.

लघवीदरम्यान जळजळ

लघवी करताना वेदना किंवा जळजळ देखील किडनी खराब होण्याचं एक लक्षण असू शकतं. ही समस्या किडनीच्या संसर्गामुळे किंवा किडनीमध्ये स्टोन होण्याच्या समस्येमुळे उद्भवते. मात्र किडनी निकामी होण्यापूर्वी देखील हे लक्षण दिसून येऊ शकतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT