Sleep: रात्री ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास शरीरात दिसतात 'हे' भयानक बदल, अजिबात इग्नोर करू नका

Less than 7 hours sleep effects: झोपेच्या अभावामुळे केवळ थकवा आणि चिडचिड वाढवत नाही तर मेंदू, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही धोकादायक परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.
Less than 7 hours sleep effects
Less than 7 hours sleep effectssaam tv
Published On

सध्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकजण पुरेशी झोप घेत नाही. कदाचित तुम्हीही असं करत असाल. जर तुम्हीही असं करत असाल तर सावध व्हा. कारण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी उत्तम नाही. झोपेच्या अभावामुळे केवळ थकवा आणि चिडचिड वाढवत नाही तर मेंदू, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्तीवरही धोकादायक परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सतत कमी झोप घेतल्याने स्मरणशक्ती कमी होणं, जलद वजन वाढणं, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुरेशा प्रमाणात झोप घेतली पाहिजे.

इतकेच नाही तर याचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे ताण, चिंता आणि नैराश्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हालाही पुरेशी झोप मिळत नसेल, तर त्यामुळे तुमच्या शरीरात हे बदल होऊ शकतात.

मेंदूवर विपरीत परिणाम

झोपेच्या कमतरतेमुळे मेंदू योग्यरित्या काम करू शकत नाही. ज्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा धोका असतो. दीर्घकाळ झोपेचा अभाव लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि स्मृतिभ्रंश यासारख्या समस्यांचा धोका वाढवू शकतो.

Less than 7 hours sleep effects
'या' लोकांना डास जास्त चावतात; संशोधनातून खरं कारण समोर

स्थूलता

कमी झोप घेतल्याने चयापचय प्रक्रिया मंदावते. ज्यामुळे शरीरात चरबी वेगाने जमा होऊ लागते. याव्यतिरिक्त, झोपेचा अभाव भूकेचे हार्मोन्स वाढवतो आणि भूक कमी करणारे हार्मोन्स कमी होतात. ज्यामुळे वारंवार भूक लागून लठ्ठपणा येतो.

हृदयाच्या आजारांचा धोका

जे लोक ७ तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका जास्त असतो. झोपेचा अभाव कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवू शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.

Less than 7 hours sleep effects
Cancer Treatment: कॅन्सरला रिव्हर्स करणारं 'स्विच' सापडलं, आता कॅन्सरच्या जीवघेण्या पेशी होणार निरोगी

इम्युनिटी कुमकुवत होते

झोप ही शरीराच्या दुरुस्ती प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. पुरेशी झोप न घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि शरीर संसर्ग, फ्लू आणि इतर आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढते.

Less than 7 hours sleep effects
Liver damage: लिव्हर खराब झाल्यास पायांमध्ये होतात 'हे' मोठे बदल; अधिकतर लोकं समजतात साधारण

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com