
बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या आजारांच्या प्रकरणात वाढ होऊ लागली आहे. यामध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचं प्रमाण देखील वाढलं आहे. कॅन्सर हा एक गंभीर आजार असून याची लक्षणं ओळखून वेळीच उपचार घेणं फायद्याचं असतं. सध्या कॅन्सरच्या प्रकारांमध्ये दिसून येणारा एक प्रकार म्हणजे पोटाचा कॅन्सर.
पोटाचा कर्करोग, ज्याला गॅस्ट्रिक कॅन्सर असंही म्हणतात. हा एक धोकादायक आजार असून जो पोटाच्या आतील आवरणात विकसित होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे प्रामुख्याने वृद्धांना प्रभावित करतं आणि अमेरिकेत दरवर्षी पोटाच्या कॅन्सरने ग्रस्त होणाऱ्या १० पैकी ६ लोकांचे वय ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक असतं.
महिलांपेक्षा पुरुषांना पोटाच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं बहुतेकदा सौम्य असतात. जर तुम्हाला अचानक तुमच्या शरीरात हे ५ बदल जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही पोटाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात.
जर तुम्ही प्रयत्न न करता वजन कमी होतं असेल किंवा तुमची भूक अचानक कमी झाली तर ते कॅन्सरच्या गाठीच्या वाढीचं लक्षण असू शकते.
पोटाच्या वरच्या भागात म्हणजेच ओटीपोटात सतत किंवा अधूनमधून होणारे वेदना, विशेषतः खाल्ल्यानंतर, हे या आजाराचं लक्षण असू शकतं. कॅन्सर जसजसा वाढत जातो तसतसं हे दुखणे अधिक वाढत जाऊ शकतं.
जर खाल्ल्यानंतर तुम्हाला वारंवार उलट्या होत असतील तर ते पोटातील कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ही समस्या अडथळा किंवा जळजळ यामुळे असू शकते.
जेव्हा पोटातील रक्त आतड्यांमधून जातं त्यावेळी शौचास साफ होत नाही. असावेळी शौचाचा रंगही बदलतो. जो अंतर्गत रक्तस्त्रावाचे लक्षण आहे.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.