Breaking News

Liver Damage: रात्रीच्या वेळेस 'ही' लक्षणं दिसल्यास समजून जा डॅमेज होतंय लिवर, दुर्लक्ष करणं पडेल महागात

Symptoms Of Liver Damage At Night: शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करून काढून टाकण्याचं काम करतं. ते अन्न पचवणाऱ्या पित्त प्रोटीनच्या निर्मितीमध्ये आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करतं.
Symptoms Of Liver Damage At Night
Symptoms Of Liver Damage At Nightsaam tv
Published On: 

लिवर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. शरीरातील अनेक महत्त्वाची कार्ये करण्यासाठी लिवर जबाबदार असतं. हे शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करून काढून टाकण्याचं काम करतं. ते अन्न पचवणाऱ्या पित्त प्रोटीनच्या निर्मितीमध्ये आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करतं. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृत निरोगी ठेवणं खूप गरजेचं आहे.

आजकाल वाईट खाण्याच्या सवयी आणि वाईट जीवनशैलीमुळे यकृताचं आरोग्य खूप बिघडतं. आजकाल लोकांमध्ये लिवरशी संबंधित आजार झपाट्याने वाढतायत. ज्यावेळी यकृत खराब होतं तेव्हा शरीरात काही लक्षणं दिसून येतात. काही लक्षणं अशी देखील आहेत जी बहुतेकदा रात्री दिसून येतात. ही लक्षणं वेळीच ओळखली गेली तर यकृत खराब होण्यापासून वाचवता येतं. ही लक्षणं काय आहेत ते जाणून घेऊया

सतत झोपमोड होणं

जर तुम्हाला रात्री झोपायला त्रास होत असेल किंवा वारंवार जागे होत असेल तर हे यकृताच्या नुकसानाचं लक्षण असू शकतं. यकृताच्या समस्यांमुळे, शरीरात टॉक्सिन पदार्थांचं प्रमाण वाढतं. जे मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतं. यामुळे झोपेशी संबंधित समस्या उद्भवू लागतात.

पायाला सूज येणं

यकृताच्या नुकसानीमुळे पाय आणि घोट्यांमध्ये सूज येण्याची शक्यता वाढते. यावेळी तुम्हाला या भागात वेदना होण्याची दाट शक्यता असते. रात्रीच्या वेळी, ही सूज खूप वाढू शकते. जर तुम्हाला हे लक्षण दिसलं तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

शरीराला खाज येणं

जर तुम्हाला रात्रीच्या वेळी तुमच्या त्वचेवर जास्त खाज येत असेल तर ते लिवरच्या नुकसानीचं लक्षण असू शकतं. खरंतर जेव्हा यकृत योग्यरित्या काम करू शकत नाही तेव्हा शरीरात पित्ताचं प्रमाण वाढतं. यामुळे त्वचेवर खूप खाज येण्याची समस्या उद्भवते.

रात्री उल्टी होणं

जर तुम्हाला रात्री मळमळ आणि उलट्या सारखी लक्षणं जाणवली तर ते यकृताच्या नुकसानीचं लक्षण असू शकतं. अशावेळी वेळीच डॉक्टरांची मदत घ्या.

लघवीचा रंग बदलणं

लघवीच्या रंगात बदल होणं हे देखील यकृताच्या समस्येतं लक्षणं आहे. ज्यावेळी यकृत योग्यरित्या कार्य करत नाही, तेव्हा शरीरात बिलीरुबिनची पातळी वाढते. ज्यामुळे लघवीचा रंग गडद पिवळा होऊ शकतो. लघवीतून फेस येणं किंवा लघवीतून दुर्गंधी येणं हे देखील यकृताच्या समस्येचं लक्षण आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com