२२ सप्टेंबर आजापासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. हिंदू धर्मातील हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा होईल. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मामध्ये देवी लक्ष्मी धन, समृद्धी आणि कल्याणाची देवी मानली जाते.
नवरात्रीमध्ये देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख, समृद्धी, संपत्ती आणि मानसिक शांती मिळते. नवरात्री देवी लक्ष्मीच्या काही उपाय केल्याने फायदा होतो.
१) घरात दररोज सकाळ- संध्याकाळ कापूर जाळा, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करेल.
२) संध्याकाळी पूजेच्या वेळी राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका. असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
३) दररोज पक्ष्यांना दाणे खाऊ घाला, यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल.
४)गुरूवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करा. याउपायाने आर्थिक स्थैर्य लाभेल.
५) शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनि आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात.
६)देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा-आराधना करा, यामध्ये गुलाबाच्या फुलांचा वापर करा.
७) देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप, स्तोत्र पठण करा. तसेच देवी लक्ष्मीला खीर पुरीचा नैवेद्या दाखवा. यामुळे देवी लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.