Manasvi Choudhary
हिंदू धर्मात नवरात्री या सणाला विशेष महत्व आहे.
यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते.
नवरात्रीत कोणत्या गोष्टी कराव्या अन् कोणत्या करू नये हे जाणून घ्या.
माता दुर्गेला लाल रंग प्रिय आहे. यामुळे लाल वस्त्र अर्पण करावे.
नवरात्रीमध्ये माता दुर्गाची मनोभावे पूजा करा यामुळे घरात सुख- समृद्धी येईल. नवरात्रीत दुर्गा मातेच्या मंत्रांचा जप करावा यामुळे मोठा फायदा होतो.
नवरात्रीत घटस्थापना केल्यानंतर देवघर बंद ठेवू नका.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत मासांहार आणि मद्यपान करू नका.
नवरात्रीच्या नऊ दिवसात लसूण आणि कांदा खाणे टाळावे.