Gudi Padwa Prasad: गुढीपाडव्याला बनवा कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद; आरोग्याला आहे फायदेशीर

Siddhi Hande

गुढीपाडवा

चैत्र शुल्क प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याला गुढी उभारली जाते.

Gudi Padwa Prasad

कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद

गुढी उभारल्यानंतर प्रसाद ठेवला जातो. यामध्ये कडुलिबांच्या पानांचा प्रसाद आवर्जुन केला जातो.

Gudi Padwa Prasad

आरोग्यासाठी फायदेशीर

कडुलिबांची पाने कडू असतात. मात्र, हा प्रसाद गोड असतो. या प्रसादामुळे शरीराला खूप फायदा होतो.

Gudi Padwa Prasad

साहित्य

कडुलिंबाचा पाला, गूळ, ओलं खोबर, चण्याची डाळ

Gudi Padwa Prasad

कडुलिंबाची पाने धुवून घ्या

सर्वात आधी तुम्हाला कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. यानंतर पाने कोरडी झाल्यावर त्याची देठ काढून घ्या.

Gudi Padwa Prasad

चणाडाळ भिजवून घ्या

यानंतर चणाडाळ भिजत घाला. हे अर्धा तास भिजून घ्या.

Gudi Padwa Prasad

कडूलिंबाची पाने

यानंतर मिक्सरच्या भांड्यात पाने, भिजवलेली डाळ, ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि गूळ बारीक करुन घ्या.

Gudi Padwa Prasad

गोळे बनवून घ्या

यानंतर तुम्ही या मिश्रणाचे बारीक गोळे करुन ठेवा. हे लहान गोळे तुम्ही खाऊ शकतात.

Gudi Padwa Prasad

प्रसाद बनवण्याची दुसरी पद्धत

तुम्हाला जर सुका प्रसाद हवा असेल तर गुळाऐवजी साखर वापरु शकतात. ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरं वापरु शकतात.

Gudi Padwa Prasad

Next: उन्हाळ्यात घरीच बनवा थंड मलाईदार मटका कुल्फी; सोपी रेसिपी करा ट्राय

Matka Kulfi Recipe | AI
येथे क्लिक करा