Sakshi Sunil Jadhav
सध्या उन्हाळा वाढत चालला आहे. अगदी सकाळच्या १० वाजताच उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे.
उन्हाळ्यात जवळपास सगळ्यांच घरांमध्ये Ac किंवा नवीन कूलर घेण्याच्या चर्चा सुरु असतात. पण बजेटमुळे लोक कूलर हा पर्याय निवडतात.
कूलर घेताना अनेकांना प्रश्न पडतो की, कूलरमधल्या पंख्यामध्ये ३ ब्लेड किंवा पाती असायला पाहिजे की ५? चला याचे फायदे नुकसान जाणून घेऊयात.
काहींच्या मते ३ ब्लेड असणारे कूलर चांगले असतात. कारण त्याने लांब पर्यंत हवा पसरते, जी ५ ब्लेड असणाऱ्या कूलरमुळे पसरत नाही.
तुम्ही तुमच्या घराच्या आकारानुसार, लांबीनुसार कूलर निवडणं योग्य ठरेल. कूलर जवळ ठेवायचा असेल तर ५ ब्लेड वाला घ्या आणि लांब ठेवायचा असेल तर ३ ब्लेड वाला घ्या.
३ ब्लेड वाला कूलर घेतल्याने लांबून पुर्ण घरातल्या कोपऱ्यांपर्यंत हवा पोहोचते. तुम्ही हा कूलर तुमच्या खिडकीत सुद्धा ठेवू शकता.
३ ब्लेड असल्यामुळे त्याची मोटर जास्त वेगाने फिरते, त्यामुळे हवा लांब पर्यंत जाते. हॉलमध्ये किंवा पूर्ण फ्लोअरवर थंड हवेसाठी हा पर्याय चांगला आहे.
५ ब्लेड किंवा पाती असणारा कूलर ज्यांना शांत आणि एकसमान हवेचा प्रवाह हवा असतो हवा जास्त दूर जाण्याची गरज नसते. तेव्हा ५ पातींचा कूलर घ्यावा