अ‍ॅसिड हल्ल्याने महाराष्ट्र हादरला...? सहावीतल्या चिमुकलीवर अॅसिड हल्ला

Acid Attack 11 Year Old Girl Sangamner: चिमुकलीनं फोडलेल्या या किंकाळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय...11 वर्षाच्या या चिमुकलीवर एका नराधमानं अॅसिड हल्ला केला.. शिवरायाच्या महाराष्ट्राला लाज आणणारी ही घटना घ़डलीय... संगमनेरच्या वडगावपान गावात...
An 11-year-old girl was severely injured in an acid attack in Sangamner, raising serious concerns about child safety in Maharashtra.
An 11-year-old girl was severely injured in an acid attack in Sangamner, raising serious concerns about child safety in Maharashtra.Saam Tv
Published On

नेमकं काय घडलं?

शाळा सुटल्यानंतर

मुलगी सायकलवरून घरी परतत होती.

आरोपीनं मुलीला निर्जनस्थळी गाठलं

जाधव कोण असल्याचं विचारलं?

मुलीच्या तोंडावर आरोपीनं अॅसिड फेकलं

अॅसिड फेकल्यानंतर आरोपी फरार

मुलीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांची घटनास्थळी धाव

अचानक झालेल्या या अॅसिड हल्ल्यात मुलीचा उजव्या बाजूचा चेहरा गंभीररीत्या भाजलाय...तिच्यावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे... त्यावेळी चिमुकलीनं नेमकं काय सांगितलं ऐका...बापाचं छत्र हरवलेल्या या मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे कुटुंबियांच्या पायाखालची जमीनचं सरकलीय...

भरदिवसा एका अल्पवयीन मुलीवर अशा प्रकारे अॅसिड हल्ला होणं, हे महाराष्ट्रासाठी लाज आणणारं आहे...या घटनेनं मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय... ज्या वयात स्वप्नांना आकार द्यायचं त्या वयात झालेल्या या हल्ल्यानं चिमुकलीची स्वप्नही धुसर झालीयेत.. निष्पाप मुलीचं आयुष्य असं उद्धस्त करण्याचा अधिकार त्या नराधमाला कुणी दिला...समाजातली ही विकृती पूर्णपणे ठेचून काढलीपाहिजे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com