Sakshi Sunil Jadhav
भारतात नवरात्रीला २२ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली आहे.
नवरात्रीचा शेवट हा १ ऑक्टोबरमध्ये होणार आहे. यादरम्यान काही लोक संपूर्ण नवरात्रीत उपवास ठेवत असतात.
तुम्ही यंदा पहिल्याच वेळेस उपवास करणार असाल तर तुम्हाला काही सोपे नियम फॉलो करावे लागतील.
तुम्ही व्रतासोबत हे नियम फॉलो केल्याने नक्कीच तुमच्यातील अडचणी दूर होतील आणि तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होतील.
पहिला नियम म्हणजे उपवास करताना व्यवस्थित गोष्टींचे पालन केले नाहीतर तुमचा उपवास तुटू शकतो.
नवरात्रीत घर स्वच्छ ठेवले पाहिजे. मगच घरात पूजा करावी. त्याने देवी प्रसन्न राहते.
देवीची पूजा करताना जमल्यास रोज वेगवेगळ्या नव्या वस्त्रांचा वापर करावा.
दररोज सकाळी ९ वाजता उठून अंघोळ करुन दिवा बत्ती करावी. याने घरात सुख समृद्धी भरभराट येते.
उपवासात तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता. त्यामध्ये साबुदाणे, बटाटे आणि फळांचा आहार घेऊ शकता.