Sakshi Sunil Jadhav
लाडक्या बहिणींसाठी कामाची बातमी म्हणजे आता या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे.
ई-केवायसी ही आजकाल बँकिंग, इन्व्हेस्टमेंट, मोबाइल वॉलेट आणि विविध आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया केली आहे. ई-केवायसीसाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.
ओळख आणि पत्ता पडताळणीसाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आहे.
टॅक्स डिटेल्ससाठी आणि व्यवहारांसाठी पॅन कार्ड महत्वाचा पुरावा आहे.
तुमची ओळख दाखवण्यासाठी वोटर आयडी महत्वाचे असते. विशेषतः जर आधार कार्ड नसेल तर हे महत्वाचे आहे.
ओळख आणि पत्ता सिद्ध करण्यासाठी हे कागदपत्र असणे आवश्यक आहे.
ओळख आणि प्रवासासाठी मान्यताप्राप्त कागद म्हणजे पासपोर्ट आहे.
पत्त्यासाठी आवश्यक, विशेषतः नवीन खाते धारकांसाठी ही कागदपत्रे असणे महत्वाचे आहे.
आधार किंवा बँकेशी लिंक असलेला मोबाईल नंबर OTP (One Time Password) साठी लागतो.