Tourism in Vangani Saam TV
लाईफस्टाईल

Tourism in Vangani : वांगणीतील सुंदर अन् मनमोहक धबधबा; निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी नक्की भेट द्या

Tourism in Vangani Waterfall : त्यातीलच एक स्थानक म्हणजे वांगणी. बदलापूरच्या पुढील रेल्वे स्थानक असलेल्या वांगणीत अनेक धबधबे आहेत. त्यातीलच एक भागिरथ वॉटरफॉल.

Ruchika Jadhav

पावसाळा म्हटलं पर्यटनप्रेमींना विविध शहरांतील धबधब्यांना भेट देण्याचे वेध लागतात. येथे भेट देत सर्वजण निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. तुम्हाला सुद्धा पावसाळ्यात धबधब्यांना भेट देणे आवडतं का? जर तुमचे सर्व स्पॉट फिरून झाले असतील तर आम्ही तुमच्यासाठी एक हिडन जागा शोधली आहे.

धबधबे जास्तप्रमाणात बदलापूर आणि कर्जत तसेच माथेरान या ठिकाणी आहेत. त्यातीलच एक स्थानक म्हणजे वांगणी. बदलापूरच्या पुढील रेल्वे स्थानक असलेल्या वांगणीत अनेक धबधबे आहेत. त्यातीलच एक भागिरथ वॉटरफॉल. हा धबधबा खरोखर अंगावर शहारे आणणारा आहे.

वांगणी रेल्वे स्थानकात येण्यासाठी तुम्हीला कर्जत किंवा खोपोली या दोनच ट्रेनचा पर्याय आहे. येथे आल्यावर तुम्हाला वॉटरफॉलकडे जाण्यासाठी रिक्षा मिळेल. रिक्षाच्या मदतीने तुम्ही येथे पोहचू शकता. रिक्षा तुम्हाला धबधब्यापासून काही अंतर आधीच सोडेल. येथे दोन रस्ते आहेत, यातील एक रस्ता कोंडेश्वरकडे जातो तर दुसरा रस्ता थेट भगिरथ वॉटरफॉलकडे जातो. तुम्हाला यातील साधा आणि खडकाळ पायवाट असलेला रस्ता निवडायचा आहे.

येथून सरळ पुढे तुम्हाला १५ मिनिटे चालावे लागेल. त्यानंतर जंगल परिसर सुरु होतो. येथून अगदी लहान आणि बारीक पायवाट धबधब्याकडे जाते. ही पायवाट पकडून गेल्यावर आणखी १५ मिनिटांनी तुम्हाला सुंदर धबधबा पाहायला मिळेल. या मार्गाने जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही धबधब्याच्या वरच्या बाजूला पोहचाल.

अनेक व्यक्ती वरतील थोड्या पाण्याचा आनंद घेत भिजतात. मात्र तुम्हाला येथे न थांबता वरून खाली पाणी कोसळणारा धबधबा पाहायचा असेल तर शेजारी आणखी एक पायवाट दिसेल. ही पायवाट तुम्हाला थेट धबधब्याच्या खालच्या बाजूस घेऊन जाईल. येथून प्रवास करणे थोडे रिस्की आहे. कारण पाऊस, शेवाळलेली जमीन आणि त्यात अगदी बारीक पायवाट आहे. पायवाट डोंगरावरून खाली उतरत नेते त्यामुळे दरीत कोसळण्याची सुद्धा भीती आहे.

वांगणीमधील हा एक हिडन स्पॉट आहे. जास्त व्यक्तींना या धबधब्याबद्दल माहिती नाही. काही ठरावीक व्यक्तीच येथे पोहण्यासाठी आणि भिजण्यासाठी येत असतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा स्वत:ची काळजी घेत येथील धबधब्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhishek Bachchan: 'मला नेहमीच तिचे कौतुक...' घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला?

Auto-Taxi Fare : 'कॉमन मॅन'ला झटका मिळणार; CNG किंमती वाढल्यानं रिक्षा, टॅक्सी भाडेही वाढणार?

Yoga: डोळ्यांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा ही योगसनं...

Viral News: नवविवाहित वधूला करावा लागला रेल्वेच्या फरशीवर बसून प्रवास; नवऱ्याने मानले रेल्वे मंत्रीचे आभार...

IPL Mega Auction 2025 Live News: आज किती खेळाडूंचं नशीब चमकणार; कोणावर लागणार कोटींची बोली?

SCROLL FOR NEXT