Mumbai Crime News: दादर रेल्वे स्थानकात बॅगमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा प्लॅन फसला

Dead Body Found In Bag At Dadar railway station: दादरमध्ये बॅगमध्ये मृतदेह सापडल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बॅगमध्ये सापडला मृतदेह
Dead Body Found In BagSaam Tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

दादर रेल्वे स्थानकात बॅगमध्ये मृतदेह सापडला आहे. काल ५ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर बॅगमध्ये मृतदेह सापडला होता. या घटनेनंतर दादर रेल्वे स्थानकात मोठा गोंधळ उडाला होता. पायधुनी पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केलीय. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

काय आहे प्रकरण?

आरोपींना मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. त्यामुळे ते मृतदेह तुतारी एक्सप्रेसने घेवून जाणार होते, परंतु आरोपींचा हा डाव रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे (Mumbai Crime News) फसला. रात्री साडेअकरा वाजेदरम्यान आरोपी प्लॅटफॉर्म ११ वरून मृतदेह असलेली बॅग गाडीत चढवत होते. परंतु संशय आल्यामुळे आरोपींच्या बॅगेची तपासणी करण्यात आली अन् आरोपींचं बिंग फुटलं.

दोन आरोपींना अटक

बॅगेची तपासणी सुरू असताना आरोपींनी पळण्याचा प्रयत्न (Dadar railway station) केला. दरम्यान एका आरोपीने पळ काढला तर दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकातून अटक केलीय. जय छावडा आणि शिवजित सिंह, असं अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. आपापसातील वादातून त्यांनी अर्शद शेख नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

बॅगमध्ये सापडला मृतदेह
AAP Leader Shot Dead : हरियाणानंतर पंजाब हादरलं! आप नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, रेल्वे फाटकाजवळ गोळीबार

हत्येच्या गुन्ह्याची नोंद

पायधूनीच्या किक्का स्ट्रीटवर आरोपींच्या घरात हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी (Mumbai News) दिलीय. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी हत्येच्या गुन्ह्याची नोंद केलीय. आरोपी आणि मयत सगळे मुक बधीर आहेत. त्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. नेमकं कोणत्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला, हत्या का केली? अशा विविध प्रश्नांचं उत्तर पोलीस शोधत (Crime News) आहेत.

बॅगमध्ये सापडला मृतदेह
MP found dead in Kolkata : बांगलादेशातील खासदार कोलकात्यामधील घरात मृतावस्थेत आढळले; अनेक दिवसांपासून होते बेपत्ता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com