बदलापूर : बदलापूरमधील पूरनियंत्रण रेषा बाधित असलेल्या शेतकरी, स्थानिक नागरिक, सोसायट्यांची पदाधिकारी गुरुवारपासून कुळगांव- बदलापूर (Badlapur) नगरपालिकेसमोर बेमुदत साखळी उपोषणास बसले आहेत. दरम्यान बदलापूरमधील पूरनियंत्रण रेषा बाधितांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर (Lok Sabha Election) बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. (Live Marathi News)
कुळगांव- बदलापूर नगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या (Ulhas River) आजूबाजूला दीड किलोमीटर लांबपर्यंत पूर नियंत्रण रेषा आखण्यात आली आहे. जलसंपदा विभागांना ही पूर नियंत्रण रेषा आखताना स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यावसायिक आणि प्रशासन यापैकी कोणालाच विश्वासात न घेता थेट पूर नियंत्रण रेषा टाकली आहे. यामुळे या भागातील शेतकरी आणि रहिवासी यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. असे असताना देखील हा विषय मार्गी लागत नसल्याने येथील नागरिकांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व समितीचे पदाधिकारी शरद म्हात्रे यांनी केले आहे. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा उपोषणकर्त्यां पूर नियंत्रण रेषा बाधित शेतकरी व स्थानिक रहिवासी संघर्ष समितीने दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.