अभिजीत देशमुख, कल्याण
कल्याण-तळोजा मेट्रो रेल्वेच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच भविष्यात मेट्रो १४ अर्थात बदलापूर मेट्रोची उभारणी झाल्यानंतर अंबरनाथ-बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे थेट नवी मुंबई-ठाणे-भिवंडी या शहरांशी जोडला जाईल, अशी महत्वाची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. (Latest Marathi News)
आज कल्याण शीळ रोडवरील कोळेगाव येथे मेट्रो १२च्या पायाभरणीला सुरुवात झाली आहे. कल्याण शीळ रस्त्यालगत कोळेगाव येथील नवीन पलावा रस्त्यावर या मेट्रोच्या पायाभरणीला सुरुवात झाली आहे. ३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले होते. त्यानंतर आठवडाभरात या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांना महत्वाची माहिती दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
श्रीकांत शिंदे म्हणाले, ' कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग हा शहरासह ग्रामीण भागातूनही जाणारा हा पहिलाच मेट्रो मार्ग आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी ५ हजार ८६५ कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी होणार आहे. या मार्गामुळे ठाणे-भिवंडी येथील प्रवासी कल्याणपर्यंत येऊ शकतील. तसेच तळोजा मार्गे नवी मुंबई मेट्रोपर्यंत पोहोचू शकतील'.
'भविष्यात मेट्रो १४ अर्थात बदलापूर मेट्रोची उभारणीची होईल. त्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर हा भाग या मेट्रोमुळे नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांशी जोडला जाईल. तसेच मेट्रो ५ ची संलग्नता मुंबई मेट्रोशी आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सोडल्यास मेट्रोने मुंबई, नवी मुंबई, ठाणे यांसारखी शहरे गाठता येतील, असं खासदार शिंदे यांनी सांगितले.
कल्याण –तळोजा असा हा मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर १९ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावर कल्याण, एपीएमसी कल्याण, गणेश नगर, पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोलोगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा ही स्थानके आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.