Someshwar Waterfall: सोमेश्वर धबधबा खळखळला, गंगापूर धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग; पाहा VIDEO

Gangapur Dam: मुसळधार पावसानं सोमेश्वर धबधब्याचं सौंदर्य फुललं आहे. गंगापूर धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे.
सोमेश्वर धबधबा खळखळला, गंगापूर धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग; पाहा VIDEO
Someshwar Water FallSaam Tv
Published On

तबरेझ शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसानं सोमेश्वर धबधब्याचं सौंदर्य फुललं आहे. गंगापूर धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केल्याने हा धबधबा प्रवाहित झाला आहे. सोमेश्वर धबधबा परिसरात नागरिक आणि स्थानिक मोठी गर्दी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये आज दुपरी 4000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं होतं. सद्यस्थितीत वाढ करून एकूण गंगापूर धरणातून 6.00 वाजता एकूण विसर्ग 6000 क्युसेक करण्यात येणार आहे. तसेच पावसचा जोर कायम असल्यास टप्या टप्याने एकूण विसर्ग वाढवण्यात येईल.

सोमेश्वर धबधबा खळखळला, गंगापूर धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग; पाहा VIDEO
Nashik Someshwar Waterfall News | गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, सोमेश्वर धबधबा प्रवाहित

दरम्यान, नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तर त्र्यंबकेश्वर परिसरात देखील मुसळधार पाऊस सुरूच आहे. गंगापूरसह नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. गंगापूर धरणातून 4000 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

सोमेश्वर धबधबा खळखळला, गंगापूर धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग; पाहा VIDEO
Raksha Khadse: नाथाभाऊ भाजपमध्ये कधी येणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंनी थेटच सांगितलं

नाशिकमध्ये गोदावरीला यंदाच्या पावसाळ्यातील पहिला पूर येण्याची शक्यता आहे. तर नांदूर मधमेश्वर धरणातून 4500 क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. चांदोरी, सायखेडा गावांना गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहेत. यासोबतच रेस्क्यू टीम चांदोरीमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com