Raksha Khadse: नाथाभाऊ भाजपमध्ये कधी येणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंनी थेटच सांगितलं

Raksha Khadse On Eknath Khadse BJP Joining: रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाविषयी मोठं विधान केलंय. गेल्या काही दिवसांपासून नाथाभाऊ यांचा भाजप प्रवेश रखडलाय.
Raksha Khadse: नाथाभाऊ भाजपमध्ये कधी येणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंनी थेटच सांगितलं
Raksha Khadse On Eknath Khadse BJP Joining
Published On

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवासांपासून एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश रखडलाय. लोकसभा निवडणुकीपूर्वीच नाथाभाऊ भाजपमध्ये प्रेवश करणार असल्याची चर्चा होता. परंतु अद्यापही एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश झालेला नाहीये. नाथाभाऊ यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत रक्षा खडसे यांनी मोठं विधान केलं असून ते कधी भाजपमध्ये येतील याची माहिती दिलीय.

नंदुरबार जिल्ह्याच्या कन्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आल्या. यावेळेस भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री खडसे यांनी घेतली. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी मंत्री खडसे यांच्यावर सोपवण्यात आलीय. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेश मंत्री रक्षा खडसे यांनी दिलेत.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री रक्षा खडसे यांनी येणाऱ्या निवडणुकीत संपूर्ण राज्यात २८८ जागा लढवायची की नाही हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असे वक्तव्य केलं. तसेच प्रत्येक पक्ष आपल्या जागेसाठी तयारी करत आहेत त्यामुळे आम्ही देखील तयारीला लागलो आहोत मात्र आतापर्यंतचे निर्णय हा महायुती सोबतच निवडणूक लढण्याच्या आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

एकनाथ खडसे भाजपमध्ये कधी प्रवेश करणार या प्रश्न देतांना त्या म्हणाल्या. नाथाभाऊ हे मागच्या काळापासून सक्रिय झालेत, त्यामुळे लवकरच पक्षश्रेष्ठी नाथाभाऊबद्दल निर्णय घेतील, असं मला विश्वास आहे.

सरकार खेळाडूंच्या पाठीशी

भारत सरकार देशातील ११८ खेळाडूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहेत. भारत सरकार आपल्या पूर्ण ताकदीने खेळाडूंच्या पाठीशी उभी आहे खेळाडूंना कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत अशी प्रतिक्रिया देखील मंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे. दरम्यान मागे एका महिन्याआधी एकनाथ खडसे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी रावेरच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. या भेटीनंतर एकनाथ खडसे यांनी माझा अनौपचारिक भाजप प्रवेश झाल्याचे सूचक विधानही केलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र लोकसभा निवडणुकांपासून खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरला नाहीये.

Raksha Khadse: नाथाभाऊ भाजपमध्ये कधी येणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंनी थेटच सांगितलं
Eknath Khadse: सुनबाईसाठी एकनाथ खडसे मैदानात; 'भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याआधीचं केली प्रचाराला सुरूवात!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com