CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलो, मुख्यमंत्री शिंदे यांची कबुली

लोकसभा निवडणुकीत गाफिल राहिलो अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच काही नेत्यांना कानपिचक्याही दिल्या.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. या निवडणुकीत आपण गाफिल राहिलो अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले की राज्यात फेक नरेटिव्ह पसरवलं गेलं. दलितांचं आरक्षण जाणार, संविधान बदलणार अशा गोष्टी पसरवल्या गेल्या. आपण गाफिल राहिलो ही वस्तूस्थिती आहे. ६० टक्के मतदान झालं असतं तर ४० जागा आल्या असत्या असे शिंदे म्हणाले. असे असताना आपली काही लोकं सुट्टीवर टूर वर गेले अशा शब्दांत शिंदे यांनी काही सहकाऱ्यांना सुनावलं. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कुणाला किती जागा मिळतील याचा विचार नका करू. सरकार आले तर सगळी पदं मिळतील असेही शिंदे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com