Promise Day SaamTv
लाईफस्टाईल

Promise Day : प्रॉमिस डेला जोडीदाराला करा 'हे' ५ रोमॅंटिक प्रॉमिस, नात्यात वाढेल प्रेमाची गोडी

Valentines Week Days : व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. उद्या ११ फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जाणार आहे. नात्यात गोडवा आणि विश्वास वाढवण्यासाठी काही वचन महत्वाचे ठरत असतात. हे वचन कोणते? ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहे.

Saam Tv

व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये वचनांना फार महत्व आहे. यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतात आणि एकमेकांप्रती विश्वास आणि समर्पणही वाढते. तुम्ही तुमच्या जोडीदाराला ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यासाठी प्रॉमिस डे हा महत्वाचा ठरतो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये ११ फेब्रुवारीला प्रॉमिस डे साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. यात येणाऱ्या प्रॉमिस डेच्या दिवशी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही खास वचने देऊ शकता. ज्यामुळे तुमचे नाते आणखी खोल आणि सुंदर होईल. या दिवशी प्रेमी, मित्र आणि जवळचे लोक एकमेकांना वचन देतात, ज्यामुळे त्यांचे नाते अधिक मजबूत होते. प्रॉमिस डे हा विश्वास आणखी मजबूत करण्यासाठी आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही रोमॅंटिक वचन सांगणार आहे. या वाचनांमुळे तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावरील प्रेम वाढेल आणि नाते अधिक घट्ट होईल.

१. नेहमी सोबत राहण्याचे वचन

नात्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचा आधार बनणे. आनंदाचा क्षण असो किंवा आयुष्यातील कठीण काळ, तुमच्या जोडीदाराला वचन द्या की तुम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहाल. या वचनामुळे त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. तसंच तुमच्या आयुष्यात त्यांचं स्थान किती महत्वाचं आहे, तुम्ही त्यांना आधार देणारे आहात हे त्यांना दिसून येईल.

२. आदर आणि समजूतदारपणाचे वचन

तुमच्या जोडीदाराला वचन द्या की तुम्ही त्यांच्या भावनांचा नेहमीच आदर कराल आणि त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकाल. कारण कोणत्याही नात्याचा पाया आदर आणि समजुतीवर आधारित असतो. हे वचन तुमच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढवेल आणि कोणताही गैरसमज दूर करण्यास मदत करेल.

३. एकत्र वेळ घालवण्याचे वचन

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवायला विसरतो. प्रॉमिस डे वर, वचन द्या की तुम्ही दररोज काही वेळ फक्त त्यांच्यासोबत घालवाल. छोटीशी चर्चा असो, एकत्र जेवण असो किंवा बाहेर फिरायला जाणे असो, हे वचन तुमच्या नात्याला ताजेपणा आणि उबदारपणाने भरेल.

४. स्वतःला सुधारण्याचे वचन

नात्यात स्वतःला सुधारणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराला वचन द्या की तुम्ही नेहमीच स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या सवयी बदलणे असो, रागावर नियंत्रण ठेवणे असो किंवा त्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेणे असो, हे वचन तुमचे नाते आणखी मजबूत करेल.

५. प्रामाणिक राहाण्याचे वचन

नात्यात प्रामाणिकपणा हा अत्यंत महत्वाचा ठरत असतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराला तुम्ही वचन द्या की तुम्ही नेहेमी तुमच्या नात्यात प्रामाणिक राहाल. तुमच्या भावना कायम जोडीदाराशी प्रामाणिकपणे शेअर करण्याचं वचन द्या. यामुळे तुमच्या नात्यात विश्वास वाढेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्या प्रेमाची सत्यता पटेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT