
फेब्रुवारीच्या 10 ते 16 तारखेदरम्यानच्या काळात ग्रहांच्या संयोगामुळे 3 राशींचे प्रेम जीवनातील आणि नातेसंबंधातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांत दुरावा निर्माण होणे ही काही आपोआप घडत नाही. नातेसंबंधात दुरावा आला असेल तर तो दूर करणं आवश्यक आहे. नवीन नातेसंबंध तयार करण्यासाठी उत्साह असणं आवश्यक आहे, तर नाते मजबूत होण्यासाठी एकमेंकांना वेळ देणं आवश्यक आहे.
मंगळ 6 डिसेंबर 2024 पासून वक्र होत आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांना भावना आणि निर्णयांबद्दल विचार करण्याची संधी मिळाली. जेणेकरून ते त्यांच्या जीवनात योग्य मार्गावर चालू शकतात. मंगळ 23 फेब्रुवारीला सरळरेषेत मार्ग क्रमण करणार आहे. परंतु त्यापूर्वी रविवारी, 16 फेब्रुवारी रोजी, त्याचा संयोग तूळ राशीतील चंद्राशी तयार होतोय. याचा परिणाम प्रेमी जोडप्यांना होणार आहे. या 3 राशींचे ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या बाजूने मदत करतील.
11 फेब्रुवारीला बुध आणि युरेनसचा केंद्र दृष्टी योग तुमच्या प्रेम जीवनात रोमँटिकता वाढवणार आहे. 15 फेब्रुवारीला बुध आणि शुक्राच्या दशंक योगामुळे तुमच्या नात्यात अधिक उत्साह आणि उत्कटता जाणवणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल आणि कोणताही तणाव दूर होण्यास मदत होईल. प्रेमसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह येईल. अविवाहित लोकांना नवीन संबंध निर्माण करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध मजबूत होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये सहकार्य आणि प्रेम वाढेल.
फेब्रुवारी महिन्यात सिंह राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल अपेक्षित आहे. 12 फेब्रुवारी रोजी म्हणजेच पौर्णिमेदरम्यान सिंह राशीच्या जातकांना त्यांच्या नात्यातील स्पष्टता आणि समज वाढेल. जुने मतभेद मिटवण्याची आणि तुमच्या जोडीदारासोबत अधिक मजबूत बंध निर्माण करण्याची हीच वेळ आहे.
मीन राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे तुमच्या प्रेम जीवनात समजूतदारपणा वाढेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत नवीन अनुभव घेता येतील. तुमच्या जोडीदाराशी संवाद सुधारेल. प्रेमसंबंधांमध्ये रोमांच आणि आकर्षण वाढेल. जुन्या नात्यांमध्ये नवीन चमक येईल. अविवाहित लोकांना नवीन नातेसंबंध तयार करण्यासाठी चांगला वेळ मिळेल.
फेब्रुवारी 2025 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराशी तुम्हाला भावनिकरित्या जोडून घेण्याची आणि तुमचे नाते मजबूत करण्याची हीच वेळ आहे. मीन राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह अनुभवायास मिळेल. कुंभ राशीतील बुधाचे संक्रमण तुमच्या नात्यात नवीनता आणि ताजेपणा आणेल. पती-पत्नीमधील प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल आणि कोणताही तणाव दूर होण्यास मदत होईल. जुने वाद सोडविण्यास कुटुंबातील सदस्यांचीही मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.