Valentine Day Lucky Zodiac : कोणाचं जुळणार लग्न? कोणाला मिळणार प्रेम? व्हॅलेंटाईन डे 'या' ६ राशींसाठी ठरेल आनंदाचा

Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे. त्यामुळे सध्या हवेत गुलाबी थंडीसह प्रेम दिसून येत आहे. मात्र आपल्या आयुष्यात देखील खरं प्रेम येईल का? असा प्रश्न सगळ्यांना पडत असतो. ज्योतिषीय ग्रहांनुसार यंदाचा १४ फेब्रुवारी हा दिवस काही राशींना चांगलं फळ देऊन जाणार आहे.
Valentine Day Horoscope
Valentine Day HoroscopeSaamTv
Published On

व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला असून व्हॅलेंटाईन डे देखील जवळ आला आहे. या काळात अनेक लोक आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. मात्र आपल्याला प्रिय असणाऱ्या व्यक्तीकडून या प्रेमाचा स्वीकार होईल का? अशी धाकधूक आपल्याला वाटत असते. मात्र यंदा काही राशींसाठी प्रेमाचा हा आठवडा आणि व्हॅलेंटाईन डे खास असणार आहे. ज्योतिषास्त्रानुसार जुळून येत असलेल्या शुभ योगांमुळे काही राशींसाठी हा व्हॅलेंटाईन डे त्यांच्या आयुष्यात खरं प्रेम घेऊन येणारा ठरणार आहे.

काही राशींचं प्रेम या काळात बहरणार आहे. ज्योतिषीय ग्रह सहा राशींच्या अविवाहित आणि सिंगल असलेल्या लोकांच्या आयुष्यात जोडीदार येण्याचे संकेत देत आहे. ज्योतिषांच्या मते, १४ फेब्रुवारीपर्यंत सहा राशी आपले प्रेम एखाद्यासमोर व्यक्त करतील आणि त्यातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद देखील मिळणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रेमाचा प्रवेश होईल? यात तुमची देखील रास आहे का? जाणून घ्या.

मेष रास : मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात लवकरच प्रेमाचा प्रवेश होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर कोणाला प्रपोज करायचे असेल हा काळ त्यासाठी चांगला आहे. ज्यांना प्रेमविवाह करण्याची इच्छा आहे, त्यांना देखील या काळात ग्रीन सिग्नल मिळू शकतो. विवाहित जोडप्यांसाठीही हा व्हॅलेंटाईन डे खास असणार आहे.

मिथुन रास : या राशीच्या लोकांना १४ फेब्रुवारीला त्यांचा जोडीदार मिळू शकतो. तसेच प्रेम जीवन हे सुखद असणार आहे. आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ तुम्ही घालवणार आहात. विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होऊ शकते. तुमच्या जोडीदाराशी याकाळात तुमची जवळीक वाढू शकते.

कन्या रास : या राशीचे लोक कायम आपल्या मानाचे ऐकतात. या व्हॅलेंटाईन डेला तुम्हाला समोरून काही प्रेमाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आपल्या जोडीदाराकडे मनातील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ योग्य असेल. काही लोक स्वतःपेक्षा मोठ्या लोकांच्याही प्रेमात पडू शकतात.

Valentine Day Horoscope
Navpancham Rajyog: उद्या मंगळ-शनी बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींच्या तिजोरीत येणार भरपूर पैसा, प्रेमसंबंध सुधारणार

वृश्चिक रास : या राशीच्या लोकांना प्रेमाचे काही चांगले प्रस्ताव मिळू शकतात. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव चालून येतील. जोडीदारासोबत काही मतभेद असतील, नात्यात दुरावा असेल तर या काळात जोडीदाराशी जवळीक वाढण्याची शक्यता आहे. नाते अधिक घट्ट होईल.

धनु रास : धनु राशीच्या लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी घट्ट नातेसंबंध निर्माण होतील. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या शोधात असलेल्यांना जोडीदार मिळू शकेल. पती-पत्नीमधील नातेही अधिक घट्ट होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत डेट प्लॅन करू शकता.

Valentine Day Horoscope
Grah Gochar: सूर्य-मंगळच्या योगाने 'या' 3 राशींचे बदलणार दिवस; लक्ष्मी माता होईल प्रसन्न

मकर रास : व्हॅलेंटाईन डे म्हणजे एखाद्याला प्रपोज करण्याची उत्तम संधी असते. तुम्ही असा प्रयत्न केल्यास तुमच्या जोडीदाराकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल. आयुष्यात प्रेम फुलण्याचा हा काळ आहे. सिंगल लोकांना नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. जोडीदारासोबत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा कराल.

Valentine Day Horoscope
Valentine's Day 2025: 'या' राशींसाठी व्हॅलेंटाइन डे होणार खास, लव्ह लाइफमध्ये होईल खऱ्या प्रेमाची एन्ट्री, मिळेल जोडीदाराची साथ

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com