Valentine Day 2025 : पार्टनरसोबत प्रायव्हसी हवीय? ना मरीन ड्राइव्ह ना जुहू चौपाटी, टॉप १० मुंबईतील रोमँटिक Hidden स्पॉट्स

Couples Spot In Mumbai : जोडीदारासोबत खास 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेट करायचा असेल तर मुंबईतील रोमँटिक ठिकाणांना भेट द्या. तुमचा जोडीदार ही ट्रिप कधीच विसरणार नाही.
Couples Spot In Mumbai
Valentine Day 2025SAAM TV
Published On

फेब्रुवारी प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात अनेकांच्या नात्याची गोड सुरूवात होते. 14 फेब्रुवारीला अनेकजण आपल्या मनातील प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतात. प्रत्येकाला आपला 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) स्पेशल करायचा असतो. त्यासाठी एक महिना आधीपासून कपल्स प्लान करतात. यात रोमँटिक ट्रिप, छोटे गिफ्ट, डिनर प्लान अशा असंख्य गोष्टी येतात.

तुम्हाला जर 'व्हॅलेंटाईन डे' खूपच स्पेशल घालवायचा असेल तर मुंबईतील काही खास ठिकाणी आपल्या जोडीदारासोबत एक संपूर्ण दिवस प्लान करा. 'व्हॅलेंटाईन डे' खास बनवण्यासाठी रोजची ठिकाणे फिरून कंटाळा आला असेल तर मुंबईत लपलेली रोमँटिक स्पॉट्सची यादी आताच तुमच्याकडे नोट करा.

टॉप १० मुंबईतील रोमँटिक Hidden स्पॉट्स

वर्सोवा बीच

अंधेरीमधील वर्सोवा समुद्रकिनारा रॉक बीच म्हणून ओळखला जातो. हे मुंबईतील खूप रोमँटिक ठिकाण आहे. या समुद्रकिनाऱ्यावर गर्दी कमी पाहायला मिळते. तुम्ही येते बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता. येथे खाण्यापिण्याचे अनेक छोटे स्टॉल आहेत.

छोटा काश्मीर

गोरेगावमधील छोटा काश्मीर देखील फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. छोटा काश्मीर गोरेगाव स्टेशनपासून जवळ आहे. येथे तलाव देखील आहे. ज्यात तुम्ही बोटींगचा आनंद घेऊ शकता.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

स्वस्तात मस्त कपल स्पॉट म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान होय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवलीमध्ये येते. हे उद्यान बोरीवलीपासून हाकेच्या अंतरावर आहे. या ठिकाणी तु्म्ही भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. तसेच तुम्ही येथे सायकलिंग , बोटिंग देखील करू शकता.

Couples Spot In Mumbai
Valentine's Day 2025: 'या' राशींसाठी व्हॅलेंटाइन डे होणार खास, लव्ह लाइफमध्ये होईल खऱ्या प्रेमाची एन्ट्री, मिळेल जोडीदाराची साथ

ग्लोबल विपश्यना पॅगोडा

गोराईजवळील ग्लोबल विपश्यना पॅगोडा जगात बेस्ट ठिकाण आहे. येथे कायम पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. तेथे तुम्ही मनःशांती देखील करू शकता. हे ठिकाण फोटोशूटसाठी देखील बेस्ट आहे.

गेट वे ऑफ इंडिया

मुंबईची शान म्हणजे गेट वे ऑफ इंडिया होय. तुम्ही येथे जोडादारासोबत बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकता. तसेच येथून तुम्हाला सूर्यास्ताचा अद्भुत नजारा पाहायला मिळेल.

एलिफंटा लेणी

तुम्ही समुद्रातून प्रवास करून एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकता. येथे तुम्ही वन डे पिकनिक प्लान करू शकता. येथे तुम्हाला डोंगरात कोरलेली लेणी पाहायला मिळतील.

कर्नाळा किल्ला

जोडीदारासोबत ट्रेकिंगचा मस्त प्लान करत असाल तर कर्नाळा किल्ला बेस्ट ऑप्शन आहे. पनवेलपासून हाकेच्या अंतरावर कर्नाळा किल्ला आहे. कर्नाळा किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. हिवाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.

गोराई बीच

बोरीवलीपासून जवळ गोराई बीच आहे. येथे तुम्ही वन डे पिकनिक प्लान करू शकता. येथे खाण्यापिण्याची आमि राहण्याची उत्तम सोय आहे. येथे तुम्ही भन्नाट कपल फोटोशूट करू शकता.

गिरगाव चौपाटी

मुंबईतजवळच फिरण्याचा प्लान करणार असाल तर गिरगाव चौपाटी बेस्ट ऑप्शन आहे. येथे तुम्हाला जोडीदारासोबत स्ट्रीट फूडचा आनंद घेता येतो. समुद्रकिनारी बसून तुम्ही जोडीदारासोबत निवांत गप्पा मारू शकता. येथे तुम्हाला पांढरी रेती पाहायला मिळते.

मढ आयलंड

मढ आयलंड समुद्रकिनारा देखील जोडीदारासोबत फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे. हा बीच स्वच्छतेसाठी ओळखला जातो. येथे तुम्ही जोडीदारासोबत छान क्षण घालवू शकता. येथे फेरफटका मारताना तुम्ही मनातील भावना जोडीदाराला सांगा.

Couples Spot In Mumbai
Chocolate Day : नात्यात प्रेम अन् गोडवा वाढवा, भन्नाट गिफ्ट्सनं जोडीदाराचा 'चॉकलेट डे' स्पेशल बनवा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com