
व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला की तरुण वर्गात या वीकमध्ये येणारे वेगवेगळे डे साजरे करण्याची लगबग बघायला मिळते. आपल्या प्रिय व्यक्तीला प्रत्येक 'डे'ला काय गिफ्ट द्यायचं याची उत्सुकता प्रत्येकाला असते. या व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. नात्यात गोडवा येण्यासाठी जोडीदाराला चॉकलेट भेट म्हणून दिले जाते. यावेळी ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे साजरा केला जाणार आहे.
चॉकलेट हे प्रेम आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे चॉकलेट डे हा या वीकमधला खास दिवस मानला जातो. म्हणूनच चॉकलेट डे ला लोक अनेकदा त्यांच्या जोडीदाराला किंवा प्रियजनांना भेट म्हणून चॉकलेट देतात. या दिवशी तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि क्रशला चॉकलेट भेट देऊ शकता. खरंतर व्हॅलेंटाईन वीक हा केवळ भेटवस्तू देण्याचा एक मार्ग नाही तर नातेसंबंधांमध्ये गोडवा आणण्याचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग असतो. त्यामुळे हा काळ अधिक अविस्मरणीय कसा बनवता येईल यावर भर दिला जातो.
चॉकलेट डेला चॉकलेटसोबत अजूनही काही भेटवस्तु आपल्या प्रिय व्यक्तीला देण्याची इच्छा आपल्याला असते. हा चॉकलेट डे अजून कसा खास करता येईल, यासाठी आपली धडपड सुरू असते. चॉकलेट डे निमित्त सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट आलेले आहेत. पण फक्त चॉकलेट देणे पुरेसे आहे का? त्याबरोबर अजून काय गिफ्ट देता येऊ शकतं? याबद्दल आपण गोंधळलेले असतो. तुमचा हाच गोंधळ कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला चॉकलेट डेला देण्यासाठी काही खास बजेट फ्रेंडली गिफ्ट आयडिया सांगणार आहोत. या भेटवस्तू केवळ प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सुंदर मार्ग नाहीत तर तुमचे नातेही मजबूत करतील.
१. ज्वेलरी
तुम्हाला तुमच्या जोडीदाराला मौल्यवान आणि संस्मरणीय काहीतरी भेट द्यायची असेल तर दागिन्यांपेक्षा चांगले काहीही नाही. तुमच्या जोडीदारासाठी हृदयाच्या आकाराचे पेंडेंट, कस्टमाइज्ड नाव असलेले ब्रेसलेट, नाजूक कानातले, बांगड्या किंवा घड्याळ भेट देऊ शकता. बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यासाठी, तुम्ही त्याचे नाव लिहिलेले स्टायलिश घड्याळ किंवा ब्रेसलेट, कफ लिंक्स आणि चेन किंवा अंगठ्यासुद्धा देऊ शकता. बाजार अनेक कपल ज्वेलरीचे पर्याय देखील उपलब्ध आहेत.
२. परफ्यूम
परफ्यूम ही एक अशी भेट आहे जी सर्वांना आवडते. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला एक क्लासिक, दीर्घकाळ टिकणारी आणि रोमँटिक भेटवस्तू द्यायची असेल, तर त्यांच्या आवडीचा परफ्यूम भेट म्हणून देऊ शकतात. बाजारात कस्टमाईज परफ्यूम देखील बनवून मिळतात. जेव्हा जेव्हा ते हे परफ्यूम लावतील तेव्हा त्यांना तुमची नक्कीच आठवण येईल.
३. कस्टमाइज्ड गिफ्ट्स
तुमच्या जोडीदाराला स्पेशल फील करवून द्यायचे असेल तर कस्टमाइज्ड गिफ्ट्स हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही स्वत: घरी असे कस्टमाइज्ड गिफ्ट्स तयार करू शकतात. त्यात तुमच्या जोडीदाराच्या आवडीच्या वस्तु तुम्ही देऊ शकतात. अन्यथा बाजारात देखील असे कस्टमाइज्ड गिफ्ट बॉक्स तयार करून दिले जातात. यात ड्रेस, शर्ट, टाय, चॉकलेट, एखादी फोटो फ्रेम, नाव किंवा फोटो असलेला मग अशा वस्तु तुम्ही कस्टमाइज्ड करू शकतात.
४. हँडमेड गिफ्ट
यात तुम्ही काही हाताने लिहिलेली पत्रं भेट म्हणून देऊ शकता. ज्यातून तुम्ही तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल वाटत असलेल्या भावना व्यक्त करू शकतात. चॉकलेटच्या बरोबर तुम्ही हँडमेड ग्रिटींग्स देखील भेट म्हणून देऊ शकता. तुमच्या दोघांच्या आठवणी असलेले हाताने बनवलेले स्क्रॅपबुक किंवा तुमच्या भावना रेकॉर्ड करणारा व्हिडिओ संदेश.
५. इलेक्ट्रॉनिक वस्तु
तुमचा जोडीदार टेक्नॉसॅवी असेल तर तुम्ही त्यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेट भेट देऊ शकतात. मोबाईल एक्सेसरी, पावर बँक, हेडफोन, स्मार्ट वॉच अशा गोष्टी तुम्ही भेट देऊ शकतात. मुलींना हेअर स्ट्रेटनर, हेअर ड्रायर, तर मुलांना ट्रिमर सारख्या गोष्टी भेट देता येतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.