Uttan To Virar : वर्सोवा-विरार फक्त ४५ मिनिटांत, 55 किमीच्या लिंक रोडचा मास्टरप्लान तयार

Uttan To Virar Sea Link : एमएमआरडीएने उत्तन ते विरारपर्यंतच्या ५५ किमीवर लिंक रोड तयार करण्याचा रोडमॅप तयार केला आहे. यामध्ये २४ किमी सी लिंकचा समावेश आहे. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार हे अंतर फक्त ४५ मिनिटात पूर्ण होणार आहे.
Versova to Virar Sea Link News
Versova to Virar Sea Link NewsSaam Tv
Published On

Versova to Virar Sea Link : वर्सोवा ते विरार हे अंतर पूर्ण करण्यासाठी जवळपास दोन तासांचा वेळ लागतो. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामनाही करावा लागतो. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी सरकारकडून खास प्लॅन तयार करण्यात आलाय. एमएमआरडीएने (Mumbai Metropolitan Region Development Authority) उत्तन ते विरारपर्यंतच्या ५५ किमीवर लिंक रोड बनवण्यासाठी प्लान तयार केला आहे. त्यामध्ये २४ किमी लांबीचा सी लिंक असेल. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार हे अंतर फक्त ४५ मिनिटात पूर्ण होणार आहे. म्हणजे, या प्रवासात जवळपास सव्वातास वाचणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीने उत्तन (भाईंदर) ते विरार दरम्यान ५५ किमी लांब नवीन लिंक रोडसाठी मास्टर प्लान तयार केला आहे. पाच पदरी आणि १९.१ मीटर रूंद लिंक रोडची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाला लवकरच मंजुरी मिळेल. हा ५५ किमी लांबीचा लिंक रोडी बीएमसीद्वारे तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक अधिक वेगवान होईल.

Versova to Virar Sea Link News
Mumbai-Pune Expressway : देशातील पहिला एक्सप्रेस वे महाराष्ट्रात, महागड्या 'एक्स्प्रेस वे वर टोल किती?

५५ किलोमीटर लांबीच्या नवीन रस्त्याचा सविस्तर आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आलाय. सध्या डीपीआरच्या आढाव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येमार आहे. या प्रकल्पामुळे कोस्टल रोडला कनेक्टिविटी मिळणार आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होईल, असे एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले.

Versova to Virar Sea Link News
Vande Bharat Express vs Green Line : भारताची वंदे भारत की पाकिस्तानची ग्रीन लाईन, कोणती एक्सप्रेस लय भारी? तिकीट कुणाचं स्वस्त?

3 ठिकाणी कनेक्टरची सुविधा, पालघरपर्यंत जाणार -

५५ किमी लांबीचा प्रकल्प आहे, या लिंकरोडवर ३ ठिकाणी कनेक्टरची सुविधा देण्यात येईल. वसई, विरार आणि उत्तन येथे कनेक्टर तयार करण्यात येणार आहेत. ५५ किमीच्या लिंकरोडसाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात आलाय. त्यासोबत एमएमआरडीए प्रोजेक्टच्या विस्ताराची योजनेवरही काम करत आहे. उत्तन ते विरार यादरम्यान होणारा लिंक रोड पुढे पालघरपर्यंत जोडण्याचा प्लान आहे.

वाहतूक कोंडीपासून सुटका होणार -

मुंबई आणि एमएमआरला जोडण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आता मुंबईत येण्यासाठी वेस्टर्न एक्सप्रेस वे आणि लोकल ट्रेन हे दोनच पर्याय आहे. लोकलमध्ये तुंडब गर्दी असते तर एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. नवीन लिंक रोड तयार झाल्यानंतर नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका होईल. तसेच लोकल ट्रेनवरील भारही कमी होईल.

एमएमआरडीएकडून दुसऱ्या फेजमध्ये विरार ते पालघर असा रोड तयार करण्यात येणार आहे. हा लिंक रोड कोस्टल रोड, वांद्रे वरळी सी लिंक, वांद्रे-वर्सोवा, वर्सोवा-दहिसर आणि दहिसर -भाईंदरमार्गे उत्तन-विरारला कनेक्ट होईल. त्यानंतर पुढे पालघरपर्यंत जाणाऱ्या रोडला जोडला जाणार आहे. नागरिकांना ट्रॅफिकमध्ये न अडकता दक्षिण मुंबईहून विरार आणि पालघरपर्यंत पोहचता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com