Valentines Day 2025: यंदाच्या 'व्हॅलेंटाईन डे'ला 'या' राशीच्या व्यक्ती राहणार सिंगल, तर 'या' राशींच्या आयुष्यात होणार खऱ्या प्रेमाची एन्ट्री

Love Predictions: 'व्हॅलेंटाईन डे' चा आठवडा प्रत्येक कपल्ससाठी किंवा तरूणांसाठी खूप स्पेशल असतो. या दिवशी काहींच्या आयुष्यात नवा जोडीदार येतो. तर काहीजण जोडीदारासोबत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करतात.
Love Predictions
Singles At Valentine DaySaam Tv
Published On

'व्हॅलेंटाईन डे' चा आठवडा प्रत्येक कपल्ससाठी किंवा तरूणांसाठी खूप स्पेशल असतो. या दिवशी काहींच्या आयुष्यात नवा जोडीदार येतो. तर काहीजण जोडीदारासोबत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करतात. फेब्रुवारीचा हा आठवडा आणि त्यातला प्रत्येक दिवस खास असतो असं बरेच प्रियकर, कवी म्हणून गेले आहे. मात्र काही व्यक्तींच्या आयुष्यात प्रेम मिळवणे फार कठीण झालेले असते. त्यांना प्रेम मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतात.

पुढील माहितीत आपण कोणच्या राशीत प्रेम मिळणार आणि कोणाच्या राशीत नाही हे आपण पाहणार आहोत.

मेष

मेष राशी असलेल्यांसाठी 'व्हॅलेंटाईन डे' खूप खास असणार आहे. तुमच्या मनात असणारा प्रियकर किंवा प्रेयसी लवकर मनातल्या गोष्टी बोलण्याची हिम्मत करणार आहेत. तसेच ही वेळ मनातले व्यक्त करण्यासाठी योग्य राहणार आहे. त्याचसोबत जे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांचे नाते आणखी घट्ट होणार आहे.

Love Predictions
Cancer Symptoms: कॅन्सरचा धोका वेळीच टाळा; आजच किचनमधल्या 'या' गोष्टींना काढा बाहेर

मिथुन

मिथून राशी असणाऱ्या व्यक्तींसाठी 'व्हॅलेंटाईन डे' सगळ्यात सुंदर आणखी उत्साहात जाणार आहे. यंदाच्या वेळेस तुम्हाला पार्टनरकडून सगळ्यात सुंदर गिफ्ट मिळणार आहे. तुम्ही सगळ्यात जास्त वेळ तुमच्या पार्टनरसोबत घालवाल. हाच तुमचा जीवनसाथी योग्य असणार आहे. अशी भावना तुमच्या मनात येईल. तसेच पार्टनरसोबत लांब फिरायला जाण्याचा प्लान सुद्धा होण्याची शक्यता आहे. नात्यात होणारे वाद या काळात नष्ट होतील. समजूतदारपणा नाते मजबूत करेल.

सिंह

सिंह या राशीच्या व्यक्ती संपुर्ण 'व्हॅलेंटाईन डे' साजरे करणार आहेत. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला करियरमध्ये पार्टनरचा सपोर्ट असणार आहे. असाच जोडीदार तुमच्या आयुष्यात असणार आहे. तर ज्यांचा रिलेशनमध्ये वाद होत असतील त्यांनी या काळात एकमेकांसोबत वेळ घालवणे योग्य राहणार आहे.

तुळ

तुळ राशीसाठी व्हॅलेंटाईन डे लकी असणार आहे. त्यांच्या आयुष्यात रोमांसची कमी भासणार नाही. तसेच पार्टनरकडून आवडीच्या भेटवस्तू मिळणार आहेत.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Love Predictions
Heart Attack: व्यायामादरम्यान हृदयविकाराचा धोका का वाढतो? कोणत्या व्यक्तींनी व्यायाम करू नये? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com