Dombivli to Thane Bus: डोंबिवलीवरुन ठाण्याला फक्त २० रुपयात; केडीएमटीने सुरु केली नवी बससेवा

Dombivli to Thane kdmt Bus Transport in just 20 Rupees: डोबिंवली ते ठाणे प्रवासासाठी बससेवा सुरु केली आहे. केडीएमटीने ८२ नंबरची बस सुरु केली आहे. बसचे तिकीट फक्त २० रुपये असणार आहे.
Dombivli to Thane Bus
Dombivli to Thane BusSaam tv
Published On
Summary

डोंबिवली ते ठाणे फक्त २० रुपयात

डोंबिवलीवरुन बससेवा सुरु

माजीवाड्याला घेणार थांबा

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोबिंवली ते ठाणे हा ट्रेन प्रवास नकोसा वाटतो. ऑफिसच्या वेळेत डोंबिवलीवरुन ठाण्याला जाण्यासाठी प्रचंड गर्दी असते. त्यामुळेच केडीएटीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता डोबिंवली ते ठाणेसाठी नवीन बससेवा सुरु करण्यात आली आहे.

Dombivli to Thane Bus
Khandesh Expressway: जळगाव ते मुंबई ५ तासात; 'खान्देश एक्सप्रेस वे' थेट समृद्धी महामार्गाशी जोडणार

डोंबिवलीकरांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी कमी करण्यासाठी केडीएमटी कडून मार्ग क्र. ८२ ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. डोंबिवली – मोठागाव – स्वामीनारायण सिटी मार्गे ठाण्यापर्यंत धावणारी ही बस सेवा प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे.सकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत दर तासाला एक फेरी असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या बसचं तिकीट फक्त २० रुपये असणार आहे. विशेष म्हणजे ही बस माजीवडा येथे थांबा घेणार असल्यामुळे मेट्रो आणि इतर वाहतूक सुविधांशी थेट जोडणी मिळणार आहे.

या बससेवेमुळे बोरिवली, नवी मुंबई तसेच मेट्रोमार्गे पुढील प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.यापूर्वी ठाण्यातील माजिवाडा ते ठाणे स्टेशनपर्यंत ३० रुपये खर्च करून प्रवास करावा लागत होता. मात्र आता डोंबिवलीहून थेट माजिवाड्यापर्यंत अवघ्या २० रुपयांत प्रवास शक्य होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या बस सेवेचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि परिवहन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.

Dombivli to Thane Bus
Dombivli : डोंबिवलीत डॉक्टर-वकिलांच्या घरांची आधी 'रेकी', मग धाडसी घरफोडी; दरोडेखोरांचा थरार सीसीटीव्हीत कैद

एकूणच, सुरक्षित, किफायतशीर आणि वेळेवर प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाल्याने डोंबिवलीकरांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून ही सेवा भविष्यात अधिक वेळ वाढवण्याची मागणीही पुढे येत आहे. यामुळे ऑफिसच्या वेळेत प्रवास करणे अधिक सुखकर होणार आहे.d

Dombivli to Thane Bus
Kalyan Dombivli : गंभीर! केडीएमसीतून आणखी एक फाईल गायब, महानगरपालिकेत नेमकं काय सुरू?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com