

जळगावरवरुन मुंबई फक्त ५ तासात
जळगाववरुन छत्रपती संभाजीनगरला खान्देश एक्सप्रेस वे
३-४ तासांचा वेळ वाचणार
राज्य सरकार समृद्धी महामार्गाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाला जळगाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे काम कुठपर्यंत आहे असा प्रश्न विधान परिषदेच्या कामकाजात विचारण्यात आला होता. त्यावर राज्य सरकारने माहिती दिली आहे. यावरुन जळगाव ते छत्रपती संभाजीनगर खान्देश एक्सप्रेस वे समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी हालचाली सुरु झाल्याचे स्पष्ट झाले आहेत.
जळगाव ते छत्रपती संभाजीनगरवरील वाहतूक अधिक वेगवान करण्याच्या उद्देशाने मागच्या वर्षी जून महिन्यात महत्त्वाची बैठक पार पडली.यामध्ये चर्चा झाली होती.
सध्या छत्रपती संभाजीनगरहून समृद्धी महामार्गवरुन मुंबईला येण्यासाठी ४ तास लागतात. त्यामुळे जर जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास एक तासाचा झाला तर जळगावला खूप फायदा होणार आहे. जळगावहून मुंबईला फक्त ५ तासात पोहचता येणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा ते मुंबईला पोहचणे खूप सोपे होणार आहे.
याचसोबत पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा मार्ग प्रस्तावित आहे. या एक्सप्रेस हायवेमुळे जळगावहून पुण्याला पोहचण्यासाठीचा वेळ कमी लागणार आहे. जळगावहून माळेगाव, नाशिकवरुन मुंबईला येतात. यासाठी ७-८ तास लागतो. परंतु आता जळगावहून जर छत्रपती संभाजीनगरला जोडले तर समृद्धी मार्गावरुन मुंबईला येण्याचा वेळ वाचेल. जळगावहून मुंबईला तुम्ही ५ तासात पोहचणार आहे. यामुळे ३ ते ४ तासांचा वेळ वाचणार आहे.
खान्देश एक्सप्रेस वे
जळगाव ते छत्रपती संभाजीनगर हा महामार्ग १०५ किमी लांब आहे. या मार्गाला खान्देश एक्स्प्रेस वे म्हटले जाते. हा महामार्ग पुढे समृद्धी महामार्गाला जोडला जाईल. सध्या महामार्गाचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.