Shreya Maskar
महाराष्ट्राला किल्ल्यांचा समृद्ध इतिहास लाभला आहे. किल्ले ही मराहाष्ट्राची शान आहे. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये किल्ल्यांवर भटकंती करा आणि इतिहासाची उजळणी करा.
बहादुरपूर किल्ला हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यात, पारोळा आणि अमळनेर शहरांदरम्यान बोरी नदीच्या काठावर वसलेला आहे.
बहादुरपूर किल्ला त्याच्या दुर्मिळ, उंच बुरुजांसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखला जातो. कारण येथे अनेक लढाया झाल्या आहेत.
बहादूरपूर किल्ला हा 1596 मध्ये बहादूरखान सुरी यांनी बांधलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे. 1818 मध्ये ब्रिटिशांनी तो पेशव्यांकडून जिंकून घेतला होता.
बहादूरपूर किल्ल्यात पर्शियन/अरबी शिलालेख आहे. जो गावाजवळ झालेली अतिक्रमणे आणि 16 व्या शतकातील लष्करी वास्तुकला, स्थानिक इतिहासावर प्रकाश टाकतो.
जळगाव स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊ शकता. बहादुरपूर किल्ल्याला इतिहासात खूप मोठे महत्त्व आहे.
जळगावला गेल्यावर अजिंठा लेणी, परोला किल्ला, महरुन पार्क, वाघूर धरण ही पर्यटन स्थळे आहे. यांना नक्की भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.