Shreya Maskar
चिकमगलूर हे कर्नाटकच्या पश्चिम घाटात वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे. जे कॉफीच्या मळ्यांसाठी, हिरव्यागार डोंगररांगांसाठी, धबधब्यांसाठी आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे.
चिकमंगलूर हे 'कर्नाटकाची कॉफी भूमी' म्हणून ओळखले जाते. मुल्लायनगिरी सारख्या उंच शिखरांनी वेढलेले आहे. जिथे ट्रेकिंग आणि निसर्गरम्य सौंदर्याचा अनुभव घेता येतो.
चिकमगलूरला येथे मुल्लयनगिरी, बाबा बुदनगिरी, कुद्रेमुख , हेब्बे धबधबा, काल्लिथीगिरी धबधबा, जरी धबधबा यांसारखी सुंदर ठिकाणे आहेत. जेथे तुम्ही फोटोशूट करू शकता.
चिकमगलूर जिल्ह्यातील बेलावाडी येथील श्री वीरनारायण मंदिर हे एक अद्वितीय होयसळकालीन, तिहेरी गर्भगृह असलेले मंदिर आहे. जे हलेबिडू आणि बेलूर यांसारख्या प्रसिद्ध मंदिरांच्या जवळ आहे.
चिकमगलूरमधील मलनाड खाद्यसंस्कृतीमध्ये तांदूळ-आधारित पदार्थ खायला मिळतात. येथील जेवणाची चव खूपच भारी असते.
हिवाळ्यात आणि पावसाळ्यात चिकमगलूर येथे आवर्जून जा. तुम्ही येथे हनिमून ट्रिप प्लान करू शकता. तुमच्या जोडीदाराला नक्कीच खूप आवडेल.
केम्मनगुंडी येथील झेड-पॉइंटवरून दिसणारा नयनरम्य सूर्यास्त पाहायला अजिबात विसरू नका.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.