Bhandara Tourism : ट्रेकिंग, ऐतिहासिक ठिकाण अन् शांत निसर्ग; सातपुडा पर्वतरांगेत वसलाय 'हा' किल्ला, पाहाल मनमोहक विहंगम दृश्य

Shreya Maskar

भंडारा

अंबागड किल्ला भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात सातपुडा पर्वतरांगेत वसलेला एक ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे, जो त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि प्राचीन स्थापत्यकलेसाठी ओळखला जातो.

Fort | google

किल्ला कोणी बांधला?

अंबागड किल्ला गोंड राजा बख्त बुलंद शाह यांच्या आदेशानुसार त्यांच्याच सुभेदार राजा खान पठाण यांनी १७०० च्या सुमारास बांधला होता. कालांतराने तो भोसल्यांच्या ताब्यात आला आणि तुरुंग म्हणूनही वापरला गेला.

Fort | google

उद्देश काय?

अंबागड किल्ला व्यापारी मार्ग आणि परकीय आक्रमणांपासून संरक्षणासाठी बांधला गेला होता. किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.

Fort | google

ट्रेकिंग

अंबागड किल्ला ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. मध्यम स्वरूपाचा ट्रेक अनुभव देतो. फोटोग्राफीसाठी तो एक चांगला पर्याय आहे.

trekking | yandex

डोंगररांग

अंबागड किल्ला दाट जंगल आणि डोंगररांगांनी वेढलेला, निसर्गाच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक आणि सुंदर किल्ला आहे.जिथे घनदाट वनराई, हिरवीगार डोंगर आणि शांत वातावरण अनुभवता येते.

Fort | google

बघेडा धरण

अंबागड किल्ल्याजवळच बघेडा धरण आहे, जे एक सुंदर पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते. येथे तुम्ही कुटुंबासोबत वन डे पिकनिक प्लान करू शकता.

Fort | google

इतर पर्यटन स्थळे

भंडारा जिल्ह्यात नागझिरा वन्यजीव अभयारण्य, कोका वन्यजीव अभयारण्य, गोंड उमरी तलाव, अंबागड किल्ला, गोसेखुर्द धरण, पावनीचा पवन राजा किल्ला आणि रावनवाडी धरण ही सुंदर पर्यटन स्थळे आहेत.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

fort | google

India Tourism : भव्य किल्ला अन् मजबूत भिंती; भारतातील 'हे' ठिकाण ऐतिहासिक पराक्रमाचे प्रतीक

India Tourism | google
येथे क्लिक करा