Shreya Maskar
बिहारमधील रोहतास गड किल्ला सोन नदीच्या काठावर, कैमूरच्या डोंगरांमध्ये वसलेला आहे.
रोहतास गड भारतातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन किल्ल्यांपैकी एक असून तो ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. जिथून सोन नदीचे विहंगम दृश्य दिसते.
रोहतास गड हा किल्ला त्याच्या भव्य तटबंदी, सुंदर दरवाजे, राजवाडे, मंदिरे आणि इतर ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे.
रोहतासगड किल्ला राजा हरिश्चंद्राचा पुत्र रोहिताश्व याने बांधला असे मानले जाते, आणि नंतर शेरशाह सुरीने तो अधिक मजबूत केले. आजही इतिहासप्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
रोहतासगड किल्ल्याला राजा हरिश्चंद्र यांचा पुत्र रोहिताश्व यांच्या नावावरून नाव मिळाले आहे. कारण पौराणिक कथेनुसार, रोहिताश्व यांनी या किल्ल्याची स्थापना केली होती.
रोहतासगड किल्ल्यामध्ये एक प्राचीन गणेश मंदिर आहे. जे मुघल सम्राट अकबरचा मनसबदार राजा मान सिंह याने सुमारे १५९० मध्ये बांधले होते. वास्तुकला आणि ऐतिहासिक महत्त्व आजही कायम आहे.
रोहतासगड किल्ला मोठ्या तटबंदी आणि डोंगरावरील त्याच्या उंच स्थानामुळे शत्रूंना रोखण्यासाठी एक अतिशय मजबूत आणि मोक्याचा किल्ला होता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.