Shreya Maskar
पुण्याजवळील खडकवासला धरण हे एक उत्तम आणि लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. येथे निसर्गरम्य वातावरण आणि शांतता अनुभवता येते.
खडकवासलाजवळ सिंहगड, पानशेत, लोणावळा-खंडाळा, लोहगड-विसापूर यांसारखी अनेक उत्तम पर्यटन स्थळे आहेत. येथील डोंगर, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ले पाहायला परदेशी पर्यटकही येतात.
खडकवासला धरणाच्या काठावर बसून निसर्गाचा आनंद घेता येतो. संध्याकाळी येथील सौंदर्य आणखी खुलते. थंड वारा अनुभवता येतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील सौंदर्य स्वर्गाहून सुंदर दिसते.
खडकवासला धरणाजवळ गेल्यावर गरमागरम भाजलेला मका आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेण्याचा अनुभव मिळतो. तुम्हाला येथे चटपटीत खायला मिळेल.
सिंहगड किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे, जो खडकवासला धरणाच्या जवळच आहे. हिवाळ्यात तुम्ही येथे ट्रेकिंगचा प्लान करा.
खडकवासला धरणावर बोटींग करता येते. पुण्याला गेल्यावर या निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्या. येथील सौंदर्य तुम्हाला भारावून टाकेल. तुम्ही येथे फोटोशूटचा मस्त आनंद घेऊ शकता.
पुणे स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षा आणि टॅक्सीने खडकवासला येथे जाऊ शकता. तुम्ही वन डे ट्रिप येथे प्लान करा. मित्रांसोबत तुफान मजा-मस्ती करता येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.