Shreya Maskar
हिवाळ्यात जर तुम्ही कोकण वारी करत असाल तर वेळणेश्वर बीचला नक्की भेट द्या. येथील नजारा कायम तुमच्या मनात घर करून राहील.
वेळणेश्वर बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरजवळच, गुहागर तालुक्यात वसलेला एक सुंदर आणि शांत समुद्रकिनारा आहे. पावसाळा आणि हिवाळ्यात येथील सौंदर्य खुलते.
वेळणेश्वर बीच शांत, स्वच्छ समुद्रकिनारा आहे. वेळणेश्वर बीच नारळाच्या झाडीने वेढलेला आहे. तुम्ही येथे प्री-वेडिंग शूट देखील करू शकता.
वेळणेश्वर बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. संध्याकाळी थंड वातावरणात येथे नक्की फेरफटका मारायला जा.
वेळणेश्वर बीच जवळच प्रसिद्ध आणि प्राचीन श्री वेळणेश्वर मंदिर आहे, हे भगवान शिवाचे एक जागृत देवस्थान असून पेशवेकालीन वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.
वेळणेश्वर मंदिरला भेट दिल्यावर सुंदर दीपमाळा आणि कमानी पाहायला मिळतात. हे ठिकाण धार्मिक स्थळासाठी ओळखला जात. येथे भक्त शंकराच्या भक्तीत तल्लीन होतात. पूजा-अर्चा करतात.
वेळणेश्वर बीचवर वॉटर स्पोर्ट्सची सुविधा मर्यादित असूनही शांत वातावरणात बोटिंगचा आनंद घेता येतो. बोटींच्या सहाय्याने समुद्राच्या सफरीचा अनुभव घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.