

दहिसर ते काशीगाव दरम्यानची मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार.
मेट्रो लाईन 9 च्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण.
चाचण्या यशस्वी; अंतिम मंजुरीनंतर मार्गिका खुली होणार.
दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो बाबत मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. दहिसर - मिरा-भाईंदर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला लवकरच सुरूवात होणार आहे. मुंबई मेट्रो लाइन 9चा पहिला टप्पा दहिसर ते काशीगावदरम्यानच आहे. दहिसर ते काशीगावदरम्यान याच आठवड्यात मेट्रो धावेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रशासनाला याबाबत कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. याची माहिती भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे.
सुमारे सात वर्षांपूर्वी दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो लाईन ९ चे काम सुरू करण्यात आले होते. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे: दहिसर ते काशीगाव आणि काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान अशा टप्प्यात हे काम होईल. पहिल्या टप्प्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मेट्रोच्या चाचण्या सुरू आहेत. हे प्रक्रिया पूर्ण करून मंजुरी मिळताच ही मार्गिका प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी महानगरपालिकेने आयोजित केलेल्या रौप्य महोत्सवी उद्घाटन समारंभात सांगितले की, त्यांनी शुक्रवारी मीरा भाईंदरमधील विविध प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या बैठकीत त्यांनी स्वतः मुख्यमंत्री मेट्रो उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले होते. दहिसर ते काशीगाव दरम्यानची मेट्रो या आठवड्यात प्रवाशांसाठी खुली असणार आहे.
मेट्रो लाइन 9 मुळे उत्तर मुंबईतील दहिसरला मिरा रोड परिसरातील काशीगावशी थेट जोडला जाणार आहे. ही मेट्रो दहिसर स्थानकातून दहिसर ते गुंडवली धावणाऱ्या मेट्रो लाइन 7ला ही थेट जोडणार आहे. ही मेट्रो सुरू होताच पश्चिम दृतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा अंदाज आहे. दहिसर टोल प्लाझावर दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असते. मेट्रो सुरू झाल्यानंतर, काशीगाव, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि इतर स्थानकांवरून थेट अंधेरीत प्रवेश होणार आहे.
दहिसर ते काशीगाव हा टप्पा 4.973 किमी लांबीचा आहे. दहिसर पूर्व ते मिरा रोड जोडणाऱ्या या टप्प्याचं काम MMRDAकडून सुरू होतं. लोकल प्रवाशांनाही या मेट्रोचा उपयोग होणार आहे. या मार्गावर एकूण 8 स्थानकं असून ही संपूर्ण मार्गिका 13.5 किमी लांबीची आहे. सध्या दहिसर ते मिरा भाईंदर प्रवासाला 1 तासाचा वेळ लागतो. वाहतूक कोंडीच्या काळात तर 75 मिनिटांपर्यंत वेळ लागत असतो. या मेट्रो मार्गिकेनं प्रवासाला फक्त 25-30 मिनिटं वेळ लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.