Breast Cancer saam tv
लाईफस्टाईल

Breast cancer statistics: भारतामधील 'या' प्रमुख शहरांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक; अभ्यासातून आकडेवारी समोर

Breast cancer incidence in India: भारतात जीवनशैलीतील बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असून, यात ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) हा एक महत्त्वाचा प्रकार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

नुकतंच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये कॅन्सरचा धोका झपाट्याने वाढतोय. JAMA ओपन नेटवर्क मध्ये प्रकाशित राष्ट्रीय कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रमाच्या स्टडी रिपोर्टनुसार, तेलंगणाची राजधानी हैदराबाद ही देशातील ‘ब्रेस्ट कॅन्सर कॅपिटल’ म्हणून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दर एक लाख महिलांपैकी ५४ महिला स्तनाच्या कॅन्सरने त्रस्त आहेत, जी देशातील सर्वाधिक घटना दर आहे. दुसऱ्या क्रमांकावर बेंगळुरू असून या ठिकाणी हा दर दर ४६.७ आहे.

दक्षिण भारत कॅन्सरच्या संकटात

अभ्यासात नमूद केलंय की, दक्षिण भारतातील महानगरं केवळ एकूणच कॅन्सरच्या संकटाला सामोरे जात नाहीत तर विशिष्ट प्रकारचे कॅन्सर या ठिकाणी साथीच्या रोगासारखे पसरत आहेत.

२०१५ ते २०१९ या काळातील ४३ लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्री (PBCR) कव्हर करून केलेल्या या अभ्यासात सांगितलंय की, राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक स्तन कॅन्सर दर असलेल्या सहा भागांपैकी चार भाग दक्षिण भारतातील आहेत.

चेन्नईमध्ये हा दर पाहिला तर १ लाख महिलांमागे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण ४५.४ आहे तर केरळमधील अलप्पुझामध्ये ४२.२ आणि तिरुवनंतपुरममध्ये ४०.७ आहे. हा पॅटर्न दक्षिण भारत, विशेषतः इथल्या शहरी भागांना भारतातील स्तन कॅन्सरचे केंद्र बनत चाललंय. २०२४ मध्ये राष्ट्रीय स्तरावर २,३८,०८५ महिलांना स्तन कॅन्सर झाला असल्याचं अहवालात नमूद आहे. हे भारतीय महिलांमध्ये सर्वात सामान्य कॅन्सर बनले आहे.

फुफ्फुसांच्या कॅन्सरचं प्रमाण किती?

अभ्यासात पुढे सांगितलंय की, स्तन कॅन्सरमध्ये जसं दक्षिण भारतीय शहरं पुढे आहेत, तसंच फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये ईशान्येकडील राज्यं आघाडीवर आहेत. मणिपूरच्या राजधानीमध्ये दर १ लाख महिलांपैकी ३३.७ महिला फुफ्फुसांच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत, तर राज्याचा सरासरी दर २४.८ आहे. तथापि, दक्षिण भारतातही फुफ्फुसांच्या कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक आहे. हैदराबादमध्ये हा दर ६.८ आणि बेंगळुरूमध्ये ६.२ इतका आहे.

कश्मीरची राजधानी श्रीनगर ही पुरुषांमधील फुफ्फुस कॅन्सरच्या बाबतीत सर्वाधिक प्रभावत असल्याचं दिसून येतं. याठिकाणी हा दर ३९.५ आहे. केरळमधील कन्नूर (३५.४), मालाबार (३२.५), कासरगोड (२६.६), अलप्पुझा (२५.३) आणि कोल्लम (२४.२) या जिल्ह्यांमध्येही हे प्रमाण खूपच जास्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT