
उच्च रक्तदाब हा गुप्त घातक आजार आहे.
धमन्यांवर ताण येऊन प्लाक तयार होतो.
उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन हा आजार बहुतेक वेळा कोणतीही स्पष्ट लक्षणं न दाखवता हळूहळू शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवतो. वेळेत लक्ष न दिल्यास तो हृदय, मेंदू, किडनी, डोळे आणि एकूणच आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकतो. सतत वाढलेला रक्तदाब शरीरावर नेमकं काय परिणाम करतो.
रक्तदाब सतत जास्त राहिल्यास धमन्यांच्या भिंतींवर ताण येतो आणि त्यावर फटी निर्माण होतात. या फटींमध्ये चरबी साचू लागते आणि प्लाक तयार होतो. यामुळे रक्तप्रवाह कमी होतो, धमन्या अरुंद होतात आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाबामुळे मेंदूतल्या रक्तवाहिन्या फुटू शकतात किंवा बंद होऊ शकतात. अशावेळी स्ट्रोकचा धोका निर्माण होतो. मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं नुकसान झाल्यामुळे स्मरणशक्ती कमी होणं, विचार करण्याची क्षमता घटणं आणि डिमेन्शियासारखे आजार उद्भवू शकतात.
डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्या फुटू शकतात किंवा त्यांच्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. यामुळे दृष्टी कमी होणं, डोळ्यांमध्ये सूज येणं किंवा कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याची शक्यता वाढते.
उच्च रक्तदाबामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक ताकद लावावी लागते. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंच्या भिंती जाड होतात. पुढे जाऊन हृदय अशक्त होतं आणि शरीराला लागणारा रक्तपुरवठा करण्यास असमर्थ ठरतं. ज्यामुळे हार्ट फेल्युअर होऊ शकतो.
सतत वाढलेला रक्तदाब किडनीतील रक्तवाहिन्यांचं नुकसान करतो. त्यामुळे किडनीचं फिल्टर करण्याचं काम नीट होत नाही. हायपरटेन्शन हा क्रॉनिक किडनी डिसीज आणि किडनी फेल्युअरचा एक प्रमुख कारण मानला जातो.
उच्च रक्तदाब धमन्यांवर कसा परिणाम करतो?
धमन्यांवर ताण येऊन प्लाक तयार होतो आणि रक्तप्रवाह कमी होतो.
मेंदूवर उच्च रक्तदाबाचा काय परिणाम होतो?
स्ट्रोक, स्मरणशक्ती कमी होणे आणि डिमेन्शियाचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांचे आरोग्य कसे प्रभावित होते?
डोळ्यांतील रक्तवाहिन्या फुटून दृष्टी कमी होऊ शकते.
हृदयावर उच्च रक्तदाबाचा काय परिणाम होतो?
हृदयाचे स्नायू जाड होऊन हार्ट फेल्युअर होऊ शकते.
किडनीच्या आरोग्यावर उच्च रक्तदाबाचा काय परिणाम होतो?
किडनीचे फिल्टर करण्याचे काम बिघडते आणि फेल्युअर होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.