पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. हवामानातील आर्द्रतेमुळे कानाच्या संसर्गाचे प्रमाण वाढतं. कानात जमा होणाऱ्या मळातील ओलावा हा जिवाणू किंवा बुरशी वाढीसाठी पावसाळ्यातील वातावरण उत्तम ठरतं. २७ ते ६६ वयोगटातील १० पैकी ४ प्रौढांमध्ये पावसाळ्यात कानाचं इन्फेक्शन वाढल्याचं दिसून येतंय.
दमट हवामान, अस्वच्छता आणि दूषित पाण्याचा संपर्क या सर्वांमुळे या ऋतुत संसर्गाच्या प्रमाणात वाढ होते. कानाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी वेळीच उपचार करणं गरजेचं आहे.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ईएनटी डॉ. सुश्रुत देशमुख म्हणाले की, पावसाळ्यात, वाढलेली आर्द्रता आणि ओलसरपणा ही जीवाणू आणि बुरशीजन्य वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करते. पावसात भिजल्यानंतर किंवा पोहताना कानात पाणी शिरल्याने कानाचा संसर्ग होऊ शकतो. विशेषतः जर कान व्यवस्थित कोरडे केले नाही तर हा संसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असते.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, पावसाळ्यात ऍलर्जी, सर्दी आणि सायनस सारखे संसर्ग देखील वाढतात, ज्यामुळे कानात जळजळ होते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती किंवा मधुमेह असलेल्या व्यक्तींना या हंगामी संसर्गाचा धोका अधिक असतो. सामान्य कारणांमध्ये कानांच्या स्वच्छतेचा अभाव, अस्वच्छ पाण्यात पोहणे किंवा जास्त वेळ इअरफोनचा वापर करणे यांचा समावेश आहे. कान दुखणे, ऐकू न येणे, कानातून स्त्राव बाहेर पडणे आणि कधीकधी ताप अशी लक्षणे दिसून येतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही प्रकरणांमध्ये, चक्कर येणं किंवा कानात आवाज येणं अशी लक्षणं दिसू शकतात. गेल्या महिन्यात १० पैकी ४ प्रौढांमध्ये कानात दुखणं, खाज सुटणं आणि कानातून द्रव बाहेर येणं यासारखी लक्षणं दिसून आली.
डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, कानाचं इन्फेक्शन टाळण्यासाठी आंघोळ केल्यानंतर किंवा पावसात भिजल्यानंतर कान स्वच्छ कोरडे ठेवा. कानात इअरबड्स, कापसाचे बोळे किंवा बोटं घालणं टाळा. घरातील आर्द्रता कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना करा. कानाची साधी तपासणी केल्याने इन्फेक्शनचं वेळीच निदान होण्यास मदत होतं.
बहुतेक प्रकरणांमध्ये औषधांचे सेवन आणि कान स्वच्छ व कोरडे ठेवल्याने संसर्ग दूर करता येतो, परंतु जर याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र ऐकू न येण्याची समस्या उद्भवू शकते. पावसाळ्यात कान कोरडे आणि स्वच्छ ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कानात वेदना, खाज सुटणं किंवा कानातून स्त्राव होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.