How to reduce belly fat: कार्डिओ आणि धावलं म्हणजे पोटाचा घेर होत नाही; पाहा बेली फॅट कमी करण्यासाठी काय करावं?
फक्त डाएट आणि व्यायामाने पोटाची चरबी कमी होत नाही
अतिव्यायाम आणि कार्डिओ शरीराला नुकसान करू शकतात
फॅट सेल्स कमी होत नाहीत, ती फक्त लहान होतात
जास्तीत जास्त लोकांचा असा गैरसमज आहे की वजन किंवा पोटाची चरबी कमी करायची असेल, तर फक्त खाणं कमी करा आणि जास्त व्यायाम करा. कदाचित तुम्हीही वजन किंवा पोटाचा घेर कमी करण्यासाठी जीम लावलं असेल. मात्र असं नाहीये. तुमचे हार्मोन्स सतत असंतुलित असतील तर तुम्ही कितीही डायट केलं, तरी पोटाची चरबी घटणार नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बेली फॅट कमी करायचं तरी कसं? जर तुम्हाला खरंच पोटाचा घेर कमी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला उपाय देणार आहोत.
फक्त कार्डिओ करून वजन जात नाही
अति कार्डिओ केल्याने शरीरावर उलट परिणाम होतो. सतत धावणं, सायकलिंग, ट्रेडमिलवर तासन्तास घालवणं यामुळे:
थायरॉईड कार्य बिघडतं
मेटॅबॉलिझम मंदावतो
कॉर्टिसॉल वाढतो
स्नायूंचं नुकसान होतं
दीर्घकाळासाठी शरीर चरबी साठवून ठेवतं
कार्डिओ करायचाच असेल, तर झोन २ कार्डिओ उत्तम मानलं जातं. यामध्ये हृदयाचं गतीमान तुमच्या कमाल क्षमतेच्या ६०–७०% दरम्यान असतं. हा प्रकार तुम्ही ४५–६० मिनिटं करू शकता. आठवड्यातून ४–६ वेळा तुम्ही या पद्धतीचा व्यायाम करू शकता. या प्रकारात शरीर जास्तीत जास्त चरबीचा इंधन म्हणून वापर करतं. पण तुम्ही खूप जोर लावला, तर शरीर लगेच कार्बोहायड्रेट वापरायला सुरुवात करतं.
खरं फॅट बर्निंग आराम करतानाच जास्त होतं
जेव्हा तुम्ही काहीही करत नाही तेव्हा तुमचं शरीर जास्त चरबी वापरतं. सामान्य आरोग्य असलेल्या प्रौढांमध्ये ६०–७०% उर्जा वापर फॅट ऑक्सिडेशनमधून होतो, म्हणजे चरबी जाळून. त्यामुळे झोप, तणाव नियंत्रण, आणि हार्मोनल संतुलन खूप महत्त्वाचं आहे. झोप हेच खरं फॅट बर्निंग स्विच आहे.
चरबी कायमची जाणं अवघड
तुमच्या शरीरात जन्मतः ठराविक संख्येने फॅट सेल्स असतात. वजन वाढलं की फॅट सेल्स मोठे होतात, आणि नवीन फॅट सेल्स तयार होऊ शकतात. याशिवाय वजन कमी झालं की फॅट सेल्स लहान होतात, पण कधीच नष्ट होत नाहीत. म्हणूनच वजन कमी केल्यानंतर त्याला कायम टिकवणं खूप कठीण असतं. एकदा तुम्ही जास्त फॅट सेल्स तयार केले तर ते कायम राहतात. म्हणून योग्य नियंत्रण ठेवलं पाहिजे.
हार्मोन्स संतुलित असणं आवश्यक
तुम्ही जास्त खाल्लं आणि कमी ऊर्जा खर्च केली तर ती उरलेली ऊर्जा ट्रायग्लिसराइड म्हणून फॅट सेल्समध्ये साठवली जाते. फॅट साठवण्यात तीन हार्मोन्स मुख्य भूमिका बजावतात. यामध्ये इन्सुलिन, ईस्ट्रोजेन, कॉर्टिसॉल यांचा समावेश आहे. त्यामुळे फक्त कॅलरीज कमी केल्या म्हणून फॅट कमी होईल, असं नाही. कॅलरीज बर्न करणं म्हणजे फॅट बर्न करणं नाही. तुम्ही १००० कॅलरीज जरी बर्न केल्या तरी जर इन्सुलिन पातळी जास्त असेल तर फॅट सेल्समधून चरबी बाहेरच येणार नाही.
फॅट बर्नसाठी इन्सुलिन कमी ठेवा
इन्सुलिन हे शरीराचं फॅट साठवण्याचं मुख्य सिग्नल आहे. इन्सुलिन जास्त असेल तर चरबी फॅट सेल्समध्येच राहतं. इन्सुलिन कमी झालं तर फॅट सेल्समधली चरबी बाहेर येते आणि शरीर ती ऊर्जा म्हणून वापरायला लागतं. सतत चॉकलेट, बिस्किट, स्नॅक्स, किंवा वेळोवेळी खाणं यामुळे इन्सुलिन सतत वाढतं. यासाठी उपवास आणि लो-कार्ब डाएट फायदेशीर ठरतं. ते इन्सुलिन पटकन खाली आणतात, आणि शरीर फॅट वापरायला सुरुवात करतं.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी काय आवश्यक आहे?
हार्मोन्सचे संतुलन, योग्य झोप, आणि इन्सुलिन पातळी नियंत्रणात ठेवणे.
फक्त कार्डिओ करून वजन कमी होते का?
नाही, अतिकार्डिओ हार्मोन्सवर वाईट परिणाम करू शकते आणि वजन कमी होण्यास अडथळा आणू शकते.
झोपेचा फॅट बर्निंगमध्ये काय भाग असतो?
झोपेदरम्यान शरीर चरबीचा वापर करते, त्यामुळे चांगली झोप आवश्यक आहे.
फॅट सेल्स कमी होऊ शकतात का?
फॅट सेल्स कमी होत नाहीत, ती फक्त लहान होतात. त्यामुळे वजन कायम ठेवणे कठीण असते.
इन्सुलिन कमी करण्यासाठी काय करावे?
लो-कार्ब डाएट आणि उपवास केल्याने इन्सुलिन कमी होते, ज्यामुळे फॅट बर्निंग सुलभ होते.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.