Climate change kidney damage: बापरे! हवामान बदलामुळे तुमची किडनी होतेय खराब; डॉक्टरांनी सांगितलं कोणते उपाय करू शकता?

How to protect kidney health: आजकाल हवामान बदलाचे दुष्परिणाम केवळ पर्यावरणावरच नव्हे, तर मानवी आरोग्यावरही दिसून येत आहेत. वाढती उष्णता, बदलणारे पर्जन्यमान, वायू प्रदूषण आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता यामुळे अनेक गंभीर आजार वाढत आहेत.
Climate change kidney damage
Climate change kidney damagesaam tv
Published On
Summary
  • हवामान बदलांमुळे किडनीचे आजार वाढत आहेत, विशेषतः उष्णतेच्या लाटांमुळे.

  • उष्णता आणि डिहायड्रेशनमुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होऊन त्याचे कार्य बिघडू शकते.

  • बाहेर काम करणारे कामगार, वृद्ध आणि ग्रामीण भागातील लोक यांना याचा जास्त धोका आहे.

हवामान बदल अधिक गंभीर होत असताना आरोग्‍यावर त्‍याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. असाच एक कमी माहिती असलेला पण प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा म्हणजे हवामान बदलाचा किडनीच्‍या आरोग्यावर होणारा परिणाम. वाढलेले तापमान, वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटा आणि अनपेक्षित हवामान हे विशेषतः भारतासारख्या देशांमध्ये अॅक्‍यूट आणि क्रॉनिक किडनीच्या आजारांसाठी प्रमुख जोखीम घटक ठरत आहेत.

उष्णतेमुळे किडनीचं होणारं नुकसान

मुंबईतील एमडी कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट डॉ. नितीन भोसले यांनी सांगितलं की, तीव्र उष्णतेमुळे घाम येतो आणि डिहायड्रेशन होते. ज्यामुळे किडनीला रक्‍तपुरवठा कमी होतो. कालांतराने वारंवार डिहायड्रेशनमुळे किडनीचे कार्य बिघडू शकते आणि क्रॉनिक किडनी डिसीज वाढू शकतो. अभ्यासातून निदर्शनास आलं आहे की, उच्‍च तापमानात दीर्घकाळ राहिल्याने उष्णतेमुळे होणारा नेफ्रोपॅथी देखील होऊ शकतो. ही अशी स्थिती आहे, जेथे विशेषतः संवेदनशील व्‍यक्‍तींमध्ये उष्णता आणि डिहायड्रेशनमुळे किडनीचे नुकसान होते.

कोणत्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो?

हवामानाशी संबंधित किडनीच्या समस्यांमुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या व्‍यक्‍तींमध्‍ये बाहेर काम करणारे कामगार वृद्ध आणि स्वच्छ पाणी किंवा आरोग्यसेवेची मर्यादित उपलब्धता असलेले ग्रामीण समुदाय यांचा समावेश आहे. या व्‍यक्‍तींना उन्हाक जास्त वेळ घालवणं, शारीरिक श्रम करणं आणि हायड्रेटेड राहण्यासाठी किंवा वेळेवर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी मर्यादित साधनांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे किडनीचा आजार होण्‍याचा धोका वाढतो.

भारतातील अनेक आरोग्य कर्मचारी किडनीच्‍या आजारासाठी हॉस्पिटलमध्‍ये दाखल होत असल्‍याचे दिसून येत आहे, विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यांत जेव्हा हवामान उष्ण असते. तीव्र उष्णता आणि अस्वच्छ परिस्थिती असलेल्या भागात अॅक्‍यूट किडनी इन्‍जुरी (एकेआय) आणि सीकेडीमध्ये वाढ दिसून येत आहे. सामान्य ट्रिगर (कारणीभूत घटक) म्हणजे डिहायड्रेशन, मूत्रमार्गात संक्रमण आणि मधुमेह व उच्‍च रक्‍तदाब यांसारखे आजार.

Climate change kidney damage
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

भारत हळूहळू हवामान आणि आरोग्य यांच्यातील संबंध ओळखत आहे. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर हवामानाशी संबंधित अनुकूल योजना असल्या तरी किडनीच्या आरोग्यासाठी प्रत्‍यक्ष धोरणात्मक हस्तक्षेप मर्यादित आहे. पण, सरकारने कर्करोग, मधुमेह, हृदयरोग व स्ट्रोक प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय उपक्रम (एनपीसीडीसीएस) सारखे आणखी सामान्य उपक्रम सुरू केले आहेत, जे अप्रत्यक्षपणे किडनीचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यास मदत करत आहेत. सार्वजनिक आरोग्य नियोजनात हवामान बदलाच्‍या आरोग्‍यावर होणाऱ्या परिणामांचे निराकरण करणं आवश्यक आहे.

काय उपाययोजना करू शकता?

किडनीचे कार्य सुरक्षित ठेवण्यासाठी व्‍यक्‍ती एक्टिव्ह उपाययोजना करू शकतात. भरपूर पाणी पिणं, जास्त सूर्यप्रकाशापासून दूर राहणं, संरक्षणात्मक उपकरणं वापरणं आणि किडनीच्या कार्याची वेळोवेळी तपासणी करणं, विशेषतः ज्यांना आधीच आजाराचे निदान झालं आहे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. कडक उन्हामध्‍ये काम करणाऱ्या कामगारांमध्‍ये जनजागृती करण्‍याचे प्रयत्‍न आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देखील प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्‍त ठरतील.

Climate change kidney damage
Heart Attack: कोणत्याही लक्षणांविनाही येऊ शकतो हार्ट अटॅक; पाहा सायलेंट हार्ट अटॅकचा धोका कोणाला जास्त?

हवामान बदलामुळे पर्यावरणीय आणि आरोग्यसंबंधित क्षेत्रात सतत बदल होत असताना धोरण, संशोधन आणि जनजागृतीद्वारे किडनीच्या आरोग्यावर हवामान बदलाचा होणारा परिणाम ओळखणं आणि त्यावर उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे.

Q

हवामान बदल किडनीला कसा प्रभावित करतो?

A

उष्णता आणि डिहायड्रेशनमुळे किडनीला रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याचे कार्य बिघडू शकते.

Q

डिहायड्रेशन किडनीसाठी का घातक आहे?

A

डिहायड्रेशनमुळे किडनीला पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नाही, त्यामुळे ती योग्य काम करू शकत नाही.

Q

कोणत्या लोकांना किडनीच्या आजाराचा जास्त धोका आहे?

A

बाहेर काम करणारे कामगार, वृद्ध आणि ग्रामीण भागातील लोकांना जास्त धोका आहे.

Q

किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी काय करावे?

A

भरपूर पाणी प्या, उन्हातून दूर रहा, संरक्षक उपकरण वापरा आणि नियमित तपासणी करा.

Q

भारतात किडनीच्या आजारात वाढ का होत आहे?

A

उष्णता, डिहायड्रेशन, मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या आजारात वाढ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com