Early detection of Cancer saam
लाईफस्टाईल

Early detection of Cancer: भारतावर कॅन्सरचं सावट; दरवर्षी 'या' कॅन्सरच्या दोन लाखांहून अधिक नव्या रूग्णांची होते नोंद

Head and neck cancer in India: भारतात कर्करोगाचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी डोके आणि मानेच्या कर्करोगाचे (Head and Neck Cancer) २ लाखांहून अधिक नवीन रुग्ण नोंदवले जात आहेत, जे एकूण कर्करोगाच्या प्रकरणांपैकी तब्बल २६% आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यापैकीच एक गंभीर आजार म्हणजे कॅन्सर. संपूर्ण देशभरात कॅन्सरचे रूग्ण वाढताना दिसतायत. अशातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड अँड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देशातील डोकं आणि मान कॅन्सरसाठी समर्पित पहिलं सुपर-स्पेशॅलिटी रुग्णालय यांचा दुसरा वर्धापन दिन होता.

या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑन्कोलॉजी कॉन्क्लेव्हमध्ये तज्ज्ञांनी भारतातील वाढत्या कॅन्सरच्या ओझ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. यावेळी लवकर निदान आणि जनजागृतीवर भर देण्याचं आवाहन केलंय.

कार्यक्रमात एचएनसीआयआयच्या “सबमेंटल फ्लॅपच्या विकास आणि तोंडाच्या कर्करोगातील पुनर्रचनेतील जागतिक महत्त्व” या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आले. या कॉन्क्लेव्हमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांनी सहभागी होत कॅन्सर उपचारातील नवीन संशोधन, शस्त्रक्रिया पद्धती आणि प्रतिबंधक उपायांवर आपली मते मांडली.

भारतावर वाढतंय कॅन्सरचं ओझं

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भारतातील एकूण कॅन्सरपैकी २७ ते ३० टक्के रुग्ण डोके आणि मानेच्या कॅन्सरचे असतात. उलट, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांत हे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरवर्षी भारतात दोन लाखांहून अधिक नवीन रुग्ण समोर येतात आणि याचे मुख्य कारण तंबाखूचे सेवन असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. चिंताजनक बाब म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे निदान उशिरा, प्रगत टप्प्यात होत असल्याने उपचार अधिक गुंतागुंतीचे ठरतात.

एचएनसीआयआयची आतापर्यंतची कामगिरी

गेल्या दोन वर्षांत या संस्थेत ५३ हजारांहून अधिक ओपीडीमध्ये रूग्ण आले असून त्यापैकी तब्बल ३० हजार मोफत होत्या. १४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना उपचार मिळाले, जवळपास ७ हजार शस्त्रक्रिया पार पडल्या. तसेच हजारो केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी सत्रे घेण्यात आली. ग्रामीण व उपेक्षित भागांपर्यंत पोहोचण्यासाठी १,६९० कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आलं.

एचएनसीआयआयचे संस्थापक डॉ. सुलतान प्रधान म्हणाले, “भारत एका कॅन्सरच्या महामारीला सामोरं जात आहे. शस्त्रक्रियेतील प्रगती महत्त्वाची असली तरी खरी गरज आहे ती प्रतिबंध मोहिमा, तपासणी कार्यक्रम आणि अशा विशेष रुग्णालयांची उभारणी करण्याची.”

या कॉन्क्लेव्हमध्ये मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर, न्यूयॉर्कचे डॉ. अशोक आर. शहा आणि मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ. फारोख उदवाडिया हे तज्ज्ञ सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी तज्ज्ञांनी कॅन्सरवरील वाढतं ओझं कमी करण्यासाठी तंबाखू नियंत्रण, जनजागृती, नियमित तपासण्या आणि संशोधन सहकार्याची तातडीची गरज असल्याचं म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचा दोन ठिकाणी राजकीय स्ट्राईक! शरद पवार गटाला धक्का, बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Shocking : रत्नागिरी हादरलं! पोटच्या मुलाने आधी केली आईची हत्या, नंतर स्वतःलाही संपवलं

Maharashtra Live News Update: जेजुरी पोलीसांचा रूट मार्च

एक किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी किती खर्च येतो?

Ganesh Chaturthi 2025 : गणपती दर्शनाला जाताना 'या' ३ रंगाचे कपडे घालणे शुभ

SCROLL FOR NEXT