जगातील नागरिकांसाठी एक मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. येत्या काळात 10 रिश्टर स्केलच्या भूकंप येणार असून यामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागणार आहे. ओक्लाहोमाचे पाद्री (Cleric) ब्रँडन डेल बिग्स यांनी ही भविष्यवाणी केली आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रँडन डेल बिग्स यांनी एक भविष्यवाणी केली होती. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाचा समावेश होता.
ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. ज्यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी सभेच्या गोळीबारात ट्रम्प यांच्या कानाला एक गोळी स्पर्श करून गेली. आता त्याच पाद्रीने लोकांचा जीव धोक्यात येईल अशी भविष्यवाणी केलीये. एका अहवालानुसार, पास्टर बिग्सने आता पृथ्वीवर येऊ घातलेल्या एका धोक्याचा इशारा दिला आहे.
पाद्री ब्रँडन डेल बिग्स म्हणाले की, देवाने त्यांना 10 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे संकेत दिले आहेत. ज्यामुळे संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. मिस्टर बिग्स यांनी दावा केलाय की, भूकंप न्यू माद्रिद फॉल्ट लाइनला धडकेल. हा भूकंप मिसूरी, आर्कान्सा, टेनेसी, केंटकी आणि इलिनॉयपर्यंत या ठिकाणांना प्रभावित करेल. यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. हा भूकंप इतका शक्तिशाली असेल की, मिसिसिपी नदीवर तो आदळून तिची दिशा बदलेल.
मिळालेल्या माहितीनुसार, जगातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप 22 मे 1960 रोजी चिलीमध्ये सुमारे 1,000 मैल लांबीच्या फॉल्टवर 9.5 तीव्रतेचा होता. यामुळे आलेल्या त्सुनामीने दक्षिण चिली, हवाईयन बेट, जपान, फिलीपिन्स, पूर्व न्यूझीलंड, दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला होता. ज्यामध्ये 8.30 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
पास्टर बिग्सच्या या अंदाजाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, 10 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे भूकंप येऊ शकत नाहीत. भूकंपाची तीव्रता हा ज्या फॉल्टवर होतो त्याच्या लांबीशी संबंध असतो. म्हणजे, फॉल्ट जेवढा जास्त तेवढा मोठा भूकंप होईल.
केवळ बिग्सच नाही तर बाबा वेंगा, नॉस्ट्राडेमस यांसारख्या इतर अनेक लोकांनी 2025 मध्ये जगात मोठ्या आपत्तीचा इशारा दिला आहे. त्यामुळे मानवजातीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये 2025 मध्ये पृथ्वीवर आदळणाऱ्या एका महाकाय लघुग्रहाचा आणि 2025 मध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर भूकंप आणि सुप्त ज्वालामुखीचा उद्रेक यांच्या आपत्तीचा समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.