Science News: शरीर अचानक हिरवं पडेल आणि दृष्टी...; मंगळ ग्रहावर कशी होऊ शकते मानवाची स्थिती, पाहा!

Science News: अनेक वर्षांपासून आपण मंगळ ग्रहावर स्थायिक होण्याचं स्वप्न पाहतोय. मात्र असं होऊ शकतं का? यावर तज्ज्ञांचं मत काय आहे ते पाहूयात.
human on mars
human on marssaam tv
Published On

पृथ्वीवर मानव अजून किती दिवस राहणार असा सवाल आता प्रत्येकांच्या मनात उभा राहतोय. हवामानात होणारा सतत बदल आणि ग्लोबल वार्मिंगमुळे पृथ्वीवर राहणं कठीण होणार असल्याचं म्हटलं जातंय. स्टीफन हॉकिंगसह काही शास्त्राज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही वर्षांनी मानवाला पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर स्थायिक व्हावं लागू शकतं. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून आपण मंगळ ग्रहावर स्थायिक होण्याचं स्वप्न पाहतोय. मात्र असं होऊ शकतं का?

स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क हे स्वप्न साकार करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचं समोर आलं आहे. परंतु, मंगळाच्या कठोर स्थितीचा मानवी शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.

human on mars
समुद्राच्या तळाशी सापडलं एक रहस्यमयी छिद्र; यामधून बाहेर पडणाऱ्या द्रव पदार्थाने वैज्ञानिकही हैराण

तज्ज्ञांचं मत काय आहे?

तज्ज्ञांच्या मते, मंगळ ग्रहावर असलेली स्थिती मानवी शरीरात अनेक धोकादायक बदल घडवून आणू शकते. जर व्यक्ती मंगळावर गेला तर त्याच्या शरीराचा हिरवा रंग होऊ शकतो आणि त्याची दृष्टी कमजोर होण्याचा धोका संभवतो. एका अमेरिकन जीव शास्त्रज्ञाच्या मतानुसार, मंगळावर मानवाचं जगणं फार कठीण आहे.

मंगळावर मानवाच्या शरीराचं काय होणार?

टेक्सासमधील राइस युनिव्हर्सिटीचे जीवशास्त्रज्ञ डॉ. स्कॉट सोलोमन म्हणाले की, मंगळावर मानवांमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन होऊ शकतं. मंगळावर राहणाऱ्या मानवांनी मुलांना जन्म दिला तर त्यांच्यामध्ये अनेक म्युटेशन आणि उत्क्रांतीवादी बदल दिसून येऊ शकतात. हे म्युटेशन कमी गुरुत्वाकर्षण आणि हाय रेडिएशनमुळे होऊ शकतं. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. हा रंग काही प्रमाणात हिरवा असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे स्नायू आणि हाडं कमकुवत होऊ शकतात.

पृथ्वीच्या तुलनेत मंगळ ग्रह छोटा

मंगळ हा पृथ्वीच्या तुलनेत छोटा ग्रह असून त्याचं गुरुत्वाकर्षण आपल्या ग्रहापेक्षा 30 टक्के कमी आहे. मंगळावर पृथ्वीप्रमाणे ओझोन थर आणि चुंबकीय क्षेत्र नाही. या दोन्ही गोष्टी पृथ्वीचे अवकाशातील रेडिएशन, अतिनील किरणं आणि सूर्यापासून निघणाऱ्या चार्ज कणांपासून संरक्षण करतात. मंगळावर अशी कोणतीही सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे या ठिकाणी राहणं मानवांसाठी कठीण असू शकतं.

human on mars
Supermassive Black Hole Merger: एकमेकांच्या समोर येणारेत दोन महाभयानक ब्लॅक होल्स; पहिल्यांदा दिसणार आश्चर्यकारक दृश्य

डॉ. सोलोमन यांच्या मते, मंगळावरील मानवी त्वचेचा रंग बदलू शकतो, ज्यामुळे रेडिएशनपासून बचाव होण्यास मदत करेल. डॉ. सोलोमन यांनी त्यांच्या फ्युचर ह्युमन पुस्तकात लिहिलंय की, कदाचित व्यक्तीच्या शरीराचा रंग हिरवा असू शकतो. गुरुत्वाकर्षण कमी झाल्यामुळे हाडांवर परिणाम होतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com