Baba Vanga Scary Predictions: जगाचा विनाश, मोठं युद्ध आणि...; बाबा वेंगा यांनी २०२५ बाबत काय भविष्यवाणी केली, पाहा

Nostradamus Scary Predictions: बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस त्यांच्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. त्यांनी माणसांशी एलियन संपर्क, व्लादिमीर पुतिन यांच्यावर हत्येचा प्रयत्न, दहशतवादी हल्ले यांच्यासह अनेक भविष्यवाणी केल्या आहे.
Baba Vanga
Baba Vanga 2025 Predictionssaam tv
Published On

Baba Vanga Predictions 2025: उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष सर्वांसाठी चांगलं जावं यासाठी प्रत्येकाजण त्यांच्या परीने प्रयत्न करणार आहे. मात्र २०२५ वर्षाबाबत काही भीतीदायक भविष्यवाण्या करण्यात आल्या आहेत. बाबा वेंगा आणि नॉस्ट्राडेमस त्यांच्या अचूक भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. त्यांनी माणसांशी एलियन संपर्क, व्लादिमीर पुतिन यांच्यावर हत्येचा प्रयत्न, दहशतवादी हल्ले यांच्यासह अनेक भविष्यवाणी केल्या आहे.

दरम्यान यांनी २०२५ बाबत काय भविष्यवाणी केली आहे यावर एक नजर टाकूयात.

ब्रिटेनसाठी अशुभ असणार 2025

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही व्यक्तींनी 2025 साली युरोपमध्ये विनाशकारी संघर्षाचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर मोठा वाद झाल्याचंही पाहायला मिळालं. आता २०२५ येणार असल्याने पुन्हा एकदा अंदाज बांधण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र हे वर्ष ब्रिटनसाठी अशुभ असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

Baba Vanga
Science News: शरीर अचानक हिरवं पडेल आणि दृष्टी...; मंगळ ग्रहावर कशी होऊ शकते मानवाची स्थिती, पाहा!

बाबा वेंगा अंध होते. ते बल्गेरियाचे रहिवासी असून 1996 मध्ये त्यांचं निधन झाले. 9/11 हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, चेरनोबिल आपत्ती आणि ब्रेक्झिट यांसारख्या महत्त्वाच्या जागतिक घटनांचं भाकीत बाबा वेंगा यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे फ्रेंचचे नॉस्ट्राडेमस यांनीही अनेक अचूक भाकितं केली आहेत.

Baba Vanga
Baba Vanga: 2025 पासून जगात होणार मानवतेचा अंत; बाबा वेंगांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी!

बाबा वेंगा यांनी काय अंदाज सांगितला?

बाबा वेंगाच्या म्हणण्यानुसार, एक विनाशकारी युद्ध युरोपला उद्ध्वस्त करणार आहे. या युद्धामुळे खंड नष्ट होणार आहे. रशिया केवळ टिकणार नाही तर जगावर वर्चस्व गाजवेल. युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज अधिकच खरा ठरणार की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. याशिवाय त्यांनी अनेक नैसर्गिक आपत्तींचे भाकीत केलं. यामध्ये अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांचा समावेश आहे.

Baba Vanga
Baba Vanga Prediction: 'या' वर्षी संपूर्ण जगाचा होणार सर्वनाश? बाबा वेंगांची भविष्यवाणी वाचून बसेल धक्का

नॉस्ट्राडेमस यांची भविष्यवाणी

नॉस्ट्राडेमसने आपल्या भविष्यवाण्यांमध्ये युरोपात विनाशकारी युद्धाचा इशाराही दिलाय. ज्यामुळे त्याचे शत्रू देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही निर्माण होणार आहेत. 2025 साठी नॉस्ट्रॅडॅमसचे अंदाज विशेषतः भयानक आहेत. विनाशकारी युद्ध, प्लेग नंतर ब्रिटन उद्ध्वस्त होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. त्यांनी भूतकाळातील मोठ्या साथीच्या रोगांबद्दल इशारा दिला आहे.

Baba Vanga
Baba Vanga Predictions: २०२५ मध्ये या राशींवर होणार पैशांचा पाऊस; बाबा वेंगाची भविष्यवाणी होतेय व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com