Sindhudurg Tourist Places SAAM TV
लाईफस्टाईल

Sindhudurg Tourist Places : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, करा निसर्गरम्य सिंधुदुर्गची सफर..

Sindhudurg Travel : पावसात सुट्टी मिळताच 'सिंधुदुर्ग'ची सफर करा. सिंधुदुर्ग मधील 'या' नयनरम्य पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या.

Shreya Maskar

पावसात महाराष्ट्र्राचे सौंदर्य आणखी खुलून येते. महाराष्ट्राला निसर्गरम्य ठिकाणांची देण आहे. पावसात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य आवर्जून अनुभवा. आपल्या कुटुंब मित्र परिवारासोबत सुट्टीमध्ये सिंधुदुर्गची सफर करा. सिंधुदुर्गला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. सिंधुदुर्ग हा जिल्हा अरबी समुद्र, गोवा, कर्नाटक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनी वेढलेला आहे. हा जिल्हा समुद्रकिनारी असल्यामुळे येथील वातावरण शांत आणि थंडगार असते.

अशा निसर्गपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'या' नयनरम्य ठिकाणाना पावसात नक्की भेट द्या आणि निसर्गाचे अद्भुत रूप पाहा.

देवगड किल्ला

देवगड हे गाव 'देवगड हापूस' आंब्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. देवगड किल्ल्याचे बांधकाम तेथील आकर्षण आहे. किल्ल्यावर गणपतीचे मंदिर देखील आहे. सिंधुदुर्गला आल्यावर पर्यटक येथे आवर्जून भेट देतात.

धामापूर तलाव

धामापूर तलाव दुतर्फा डोंगराच्या मधोमध आहे. पावसात येथील हिरवेगार सौंदर्य पाहायला लोक येथे येतात. धामापूर तलाव पर्यटनाचे आकर्षण आहे. या तलावामध्ये आपण बोटिंगचा आनंद देखील लुटू शकतो.

कुणकेश्वर मंदिर

कुणकेश्वर दक्षिण कोकणची काशी म्हणूनही ओळखले जाते. कुणकेश्वर मंदिर देवगड जवळील आकर्षण आहे. या मंदिराला स्वच्छ, सुंदर आणि शांत असा समुद्रकिनारा लाभला आहे.

रॉक गार्डन

समुद्रकिनारी खडकाळ भागात हे गार्डन बांधण्यात आले आहे. येथे विविध फुल आणि हिरवळ पाहायला मिळते. सिंधुदुर्गमधील मालवण येथे रॉक गार्डन आहे. लहान मुलांना मनसोक्त मजा करता येईल असे या गार्डनचे सौंदर्य आहे.

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रातील जलदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्गची शान आहे. या किल्ल्याला पर्यटक आवर्जून भेट देतात आणि महाराजांचा इतिहास अनुभवतात. येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

निवती बीच

निवती बीच निर्जन समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. या बीचला भेट दिल्यावर तुम्हाला पांढऱ्या वाळूमध्ये खेळण्याचा आनंद घेता येईल. पावसात निवती बीचवर निसर्गाचे अद्भुत सौंदर्य पाहायला मिळते.

तारकर्ली बीच

तारकर्ली बीच 'कोकणातील क्वीन बीच' म्हणून ओळखला जातो. तारकर्ली बीच अनेक झाडामाडांनी सजलेला आहे. पावसात या समुद्राला आवर्जून भेट द्या. पावसात येथील वातावरण मनाला सुखावून जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

Maharashtra Live News Update: मनमाड-येवला मार्गावरील अंकाई शिवारात टँकरची रिक्षाला धडक, 6 जण जखमी

Yerwada jail : धक्कादायक! येरवडा कारागृहात हाणामारी; कंबर आणि डोक्यात फरशी घातली, आरोपीचा मृत्यू

बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT