Hapus Mango : देवगडचा की दक्षिण भारतातला? खरा हापूस आंबा कसा ओळखाल?

How To Identify A Hapus Mango : देवगडचा हापूस आंबा कोणता आणि दक्षिण भारतातला कोणता हे कसं ओळखायचं? श्री बागल, निवृत्त जिल्हा अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी 'साम डिजिटल'ला याबाबत नेमकी माहिती दिली.
Hapus Mango
Hapus Mango Saam TV

उन्हाळा सुरू होताच सर्व बाजारपेठा आंब्यांनी बहरल्या आहेत. खेडेगावापासून शहरांच्या बाजारपेठांमध्ये आंबे विकण्यासाठी आले आहेत. आंबा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे संपूर्ण वर्षभर वाट पाहिल्यानंतर तुम्हाला रसाळ आणि गोड आंब्याची चव चाखता येते. यामध्ये हापूस आंबा म्हणजे विषयच हार्ड.

Hapus Mango
Konkan Hapus: इतर राज्यातील आंबा ‘कोकण हापूस' म्हणून विकल्यास कारवाई होणार, पणन संचालकांचे आदेश

हापूस आंब्याची चव महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील नागरिकांना देखील प्रचंड आवडते. काही ठिकाणी परदेशात देखील हापूस आंबे आवडीने खाल्ले जातात. पण तुम्हाला माहितीये का? हापूस आंबा दोन प्रकारचा आहे. एक म्हणजे आपल्या देवगडचा हापूस (Mango) आणि दुसरा म्हणजे दक्षिण भारतातला हापूस.

आता तुम्ही म्हणाल यातला देवगडचा कोणता आणि आपल्या दक्षिण भारतातला कोणता, हे कसं ओळखायचं? तर निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग श्री बागल यांनी साम टीव्हीला याबाबत माहिती दिली आहे.

आकार

देवगडचा हापूस आकाराने देठाकडे फुगीर असतो. तर दक्षिण भारतातला हापूस देठाकडे चपट्या आकाराचा असतो.

पेटी

देवगडच्या हापूस आंब्याची पेटी कायम लाकडी असते. तसेच दक्षिण भारतातील हापूस आंब्याची पेटी साध्या पुठ्ठ्याची असते.

वजन

देवगडच्या हापूस आंब्याचं वजन साधारण २५० ते ४०० ग्रॅम इतकं असतं. तर याची लाकडी पेटी ३, ५ आणि १० डझनाची असते. तर दक्षिण भारतातील हापूस आंब्याचं वजन ३०० ते ५०० ग्रॅम इतकं असतं. ही कागदी पेटी केवळ १ ते २ डझनाची असते.

रंग

देवगडचा हापूस कापल्यावर केशरी रंगाचा दिसतो. तर दक्षिण भारतातील हापूस कापल्यावर पिवळ्या रंगाचा दिसतो.

चव

या दोन्ही आंब्यांच्या चवीतही बराच फरक आहे. देवगडचा हापूस आंबा मधासारखा मधाळ लागतो. तर दक्षिण भारतातील आंब्याची चव थोडी आंबट असते.

साल

देवगड हापूस आंब्याची साल अगदी पातळ असते. तर दक्षिण भारतातील हापूस आंब्याची साल थोडी जाडसर असते.

सध्या बाजारात हापूस आंब्यांची विक्री मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. महाराष्ट्रातील व्यक्तींना शक्यतो देवगडचा हापूस आंबा पाहिजे असतो. मात्र खरा आंबा ओळखण्याचे निकष महिती नसल्याने विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक देखील होते. मात्र आता निवृत्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सिंधुदुर्ग. श्री बागल यांनी दिलेल्या या निकषांच्या आधारे तुम्ही योग्य हापूस आंबा निवडून मनसोक्त खाऊ शकाल.

Hapus Mango
Ratnagiri Hapus : खवय्यांसाठी खुशखबर..रत्नागिरी हापूस दाखल; पुण्याच्या मार्केटमध्ये पहिल्या पेटीला मिळाला इतका दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com